इडली-सांबार, भगर, थालीपीठ आणि... शाळेत मध्यान्ह भोजनात मिळणार टेस्टी जेवण

शालेय विद्यार्थ्यांना आता  मध्यान्ह भोजनात  पौष्टिक आणि टेस्टी जेवण मिळणार आहे. सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

Aug 08, 2023, 23:52 PM IST

Mid Day Meal In School : शाळेत मध्यान्ह भोजनात खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज आहे. आता खिचडीसोबतच इडली-सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचं सत्त्व आणि पराठाही मिळणारे आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं नेमलेल्या समितीनं शिफारस केली आहे. 

1/5

मध्यान्ह भोजनात शालेय विद्यार्थ्यां पौष्टिक आणि चवदार जेवण मिळणार आहे. 

2/5

मध्यान्ह भोजन पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. 

3/5

मध्यान्ह भोजन तयार करणा-या व्यक्ती, संस्थांच्या मानधनात वाढ करण्याचीही शिफारस आहे.

4/5

राज्य सरकारनं नेमलेल्या समितीनं शिफारस केलीय. त्यानुसार दर दोन दिवसांनी आहार बदलावा लागणारे

5/5

खिचडीसोबतच इडली-सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचं सत्त्व आणि पराठाही मिळणार आहे.