डान्स इंडिया डान्सचा सीजन ६ चा मानकरी ठरला सांकेत गांवकर

Feb 19, 2018, 09:38 AM IST
1/6

डान्स इंडिया डान्सचा सीजन ६ चा ग्रॅंड फिनाले रविवारी झाला आणि या सीजनमध्ये सांकेत गांवकरने हा किताब पटकवला. सांकेत कर्नाटकचा असून तो खूप वर्षांपासून डान्स शिकत आहे. 

2/6

सांकेत मुंबईच्या शो मध्ये ऑडिशनसाठी आला होता. तेव्हापासूनच्या त्याच्या मेहनतीचे काल चीज झाले. कंटेपरी डान्समध्ये सांकेतचा हातखंड आहे.

3/6

डीआयडीच्या या सीजनमध्ये मुद्दसार खान, मर्जी पेस्टोनी आणि मिनी प्रधान जज आहेत. तर डीआयडीच्या प्रत्येक सीजनमध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथून चक्रबर्ती यांनी महा जज म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

4/6

शोच्या ग्रॅंड फिनालेमध्ये कॉमेडीयन सुनील ग्रोवरनेही प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.

5/6

सांकेत बीएससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. आता त्याचा प्रोफेशनल कॉरिओग्राफी शिकण्याचा मानस आहे.

6/6

सांकेतच्या व्यतिरिक्त नैनिका, अनासुरू, शिवम पाठक आणि पीयुष हे अंतिम स्पर्धक होते. मात्र सर्वांना मागे टाकत सांकेतने हा किताब स्वतःच्या नावे केला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x