Maharashtra Assembly Election: ही त्यांची लायकी, आयुष्यभर फेकलेले तुकडे चघळणार...; जागा वाटपावरुन संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्त्र

Maharashtra Assembly Election: ही त्यांची लायकी, आयुष्यभर फेकलेले तुकडे चघळणार...; जागा वाटपावरुन संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्त्र : आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याने चर्चांना उधाण आलं होतं. 

Mar 18, 2023, 15:17 PM IST

Sanjay Raut : शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जागा वाटपासंदर्भात एक व्हिडीओ समोर आला होता. त्यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

1/7

chandrashekhar bawankule

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर जागावाटपात शिंदे गटाला फक्त ४८ जागा मिळणार अशी चर्चा सुरु झाली होती.

2/7

cm eknath shinde devendra fadnavis

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा तर 48 जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्या जाणार आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.

3/7

sanjay raut criticize shinde group

ही त्यांची लायकी आहे. 2014 मध्ये शिवसेनेने एका जागेसाठी युती तोडली होती. त्यांच्यावर तुकडे फेकले आहेत आणि आयुष्यभर तुकडेच फेकले जातील, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

4/7

sanjay raut

हे तुकडे तोंडात ठेवूनच चघळत त्यांना जगावे लागेल. यांना कुठला स्वाभिमान आहे? भाजपचे प्रदेशाध्यक्ष सांगत आहे की तुम्हाला 48 जागा देऊ. उद्या पाच जागा पण फेकतील यांच्या तोंडावर. 

5/7

sanjay raut on bjp

भाजपने शिवसेना यासाठीच तोडली. त्यांना महाराष्ट्रातील शिवसेनेचा रुबाब, दरारा संपवायचा होता म्हणून त्यांनी शिवसेना तोडली.

6/7

sanjay raut warning

सगळे मिंधे लोक त्यांच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगणार आहेत. पण खरी शिवसेना कोणती याचा निर्णय जनताच घेणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

7/7

chandrashekhar bawankule

दरम्यान, या संदर्भात चर्चा सुरु झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव केली आहे. व्हिडीओचा अर्धाच भाग व्हायरल करण्यात आल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.