रोजच्या स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावी? फायदे आणि तोटे दोन्ही समजून घ्या
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावी? कोणती भांडी आरोग्यासाठी चांगली असतात? असे अनेक प्रश्न महिलांना भेडसावत असतात. आज आम्ही तुम्हाला प्रत्येक भांड्यांचे फायदे व दुष्परिणाम सांगणार आहोत.
Mansi kshirsagar
| Mar 17, 2024, 16:56 PM IST
Kitchen Hacks In Marathi: स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावी? कोणती भांडी आरोग्यासाठी चांगली असतात? असे अनेक प्रश्न महिलांना भेडसावत असतात. आज आम्ही तुम्हाला प्रत्येक भांड्यांचे फायदे व दुष्परिणाम सांगणार आहोत.
1/9
रोजच्या स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावी? फायदे आणि तोटे दोन्ही समजून घ्या
![रोजच्या स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावी? फायदे आणि तोटे दोन्ही समजून घ्या Safest cooking utensils for healthy living in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/17/718556-alumiiumbn1.jpg)
2/9
अॅल्युमिनियम कोटिंग असलेली नॉनस्टिक भांडी
![अॅल्युमिनियम कोटिंग असलेली नॉनस्टिक भांडी Safest cooking utensils for healthy living in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/17/718555-alumiiumbn2.jpg)
- फायदे घरात हृदयविकाराचा रुग्ण असतील तर ही भांडी बेस्ट आहेत. कारण या भांड्यात कमी तेलात किंवा बिन तेलाचाही स्वयंपाक होऊ शकतो. साफ करण्यासही सोप्पी असून हलकी व परवडणारी आहेत. आल्मयुक्त पदार्थांवर प्रतिक्रिया होत नाही. - तोटे या भांड्याचे तोटे म्हणजे कोटिंग निघाल्यास टॉक्सिक होऊ शकतात. इतर भांड्याइतकी टिकाऊ नसतात. तसंच, या भांड्यासाठी मेटलचे चमचे वापरु शकत नाही. ही भांडी घासताना खूप काळजी घ्यावी लागते. ताऱ्याचा काथा वापरु शकत नाही.
3/9
बीडाची भांडी
![बीडाची भांडी Safest cooking utensils for healthy living in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/17/718554-alumiiumbn3.jpg)
- फायदे बीडाचा तवा डोसा किंवा घावणे काढण्यासाठी वापरला जातो. ही भांडी दीर्घकाळ टिकतात तसंच, फुटतदेखील नाहीत. सर्व बाजूनी एकसमान तापमान देतात. नीट सीझन केल्यास नॉनस्टीकसारखी राहतात. - तोटे बीडाची भांडी वापरताना ती वेळोवेळी सीझन करणे गरजेचे असते. तसंच, ती वापरण्यासाठी खूप जड असतात व किंमतही जास्त असते.
4/9
स्टीलची भांडी
![स्टीलची भांडी Safest cooking utensils for healthy living in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/17/718553-alumiiumbn4.jpg)
- फायदे स्टीलची भांडी अनेकदा सर्रास वापरली जातात. कारण या भांड्यात उष्णता नीट सर्व बाजूनी पसरवतात. टिकाऊ आणि गंज प्रतिरोधक असतात. इंडक्शनसाठीही तुम्ही त्याचा वापर करु शकता. या भांड्यासाठी विशेष निगा राखायची गरज नसते. - तोटे ही भांडी नॉनस्टिक नसतात. त्यामुळं नॉनस्टिक बनवण्यासाठी जास्त तेलाचा वापर करावा लागतो.
5/9
मातीची भांडी
![मातीची भांडी Safest cooking utensils for healthy living in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/17/718552-alumiiumbn5.jpg)
- फायदे हल्ली मातीच्या भांड्यांचा ट्रेंड पुन्हा येऊ घातला आहे. मातीची भांडीही बिनविषारी आणि पर्यावरणास अनुकूल असतात. तसंच, या भांड्यात अन्न शिजवल्याने पदार्थाचा एक वेगळीच चव येते. उष्णता नीट पसरवतात. - तोटे मातीची भांडी वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. जपून वापरावी लागतात. तसंच, वापरण्याच्या आधी स्वच्छ करणे खूप वेळखाऊ असतात. पदार्थ शिजवताना तापमान कमी ठेवावं लागते त्यामुळं शिजण्यास जास्त वेळ लागतो. कधीकधी अन्नपदार्थ चिकटून राहू शकतात.
6/9
Granite Non - Stick Coating
![Granite Non - Stick Coating Safest cooking utensils for healthy living in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/17/718551-alumiiumbn6.jpg)
- फायदे तुम्हाला जर कमी तेलाचा किंवा बिनतेलाचा स्वयंपाक करायचा असेल. तर ही भांडी सर्वोत्तम आहेत. स्वच्छ करण्यासही सोप्पी आहेत. तसंच, हाताळायला हलकी व किंमतही कमी. त्याचबरोबर, आल्मयुक्त पदार्थांवर प्रतिक्रिया करत नाहीत. - तोटे या भांड्यांचे कोटिंग निघाल्यास टॉक्सिक ठरू शकतात. तसंच, इतर भांड्याइतकी टिकाऊ नाहीत. ही भांडी घासताना नीट काळजी घ्यावी लागते.
7/9
लोखंडी भांडी
![लोखंडी भांडी Safest cooking utensils for healthy living in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/17/718550-alumiiumbn7.jpg)
- फायदे लोखंडी भांडी दीर्घकाळ टिकतात. त्याचबरोबर यात पदार्थ शिजवल्यास लोहाचे प्रमाण त्यात मिसळते. तसंच, किंमतही कमी आहे. लोखंडी भांडी योग्यप्रकारे सिझन केल्यास नॉनस्टिक बनू शकतात. म्हणजे तेलाचा वापरही कमी होतो. - तोटे लोखंडाची भांडी वेळोवेळी सीझन करणे गरजेचे आहे. तसंच वापरण्यासाठी थोडी जड असतात. मायक्रोव्हेव व डिशवॉशरमध्ये वापरण्याजोगी नसतात. लोखंडाच्या भांड्यांना लगेच गंज पकडतो त्यामुळं तेल लावून ठेवावी लागतात.
8/9
अॅल्युमिनियमची भांडी
![अॅल्युमिनियमची भांडी Safest cooking utensils for healthy living in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/17/718549-alumiiumbn8.jpg)
- फायदे अॅल्युमिनियमची भांडी सहज बाजारात उपलब्ध होतात. हलके व हाताळण्यास सोपे असतात. अगदी स्वस्त दरात उपलब्ध होतात. अॅल्युमिनियम लगेच गरम होत असल्याने गॅसचीही बचत होते. टिकाऊ व गंज प्रतिरोधक असतात. - तोटे अॅल्युमिनियमच्या भांड्यात जास्त तापमानात पदार्थ बनवल्यास टॉक्सिक डेटिंग आणि स्क्रॅचिंग होण्याची शक्यता असते. मायक्रोव्हव व डिशवॉशरसाठी सुरक्षित नाहीत. आंबट पदार्थ बनवल्यास प्रतिक्रिया होते.
9/9
Disclaimer
![Disclaimer Safest cooking utensils for healthy living in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/17/718548-alumiiumbn9.jpg)