...अन् पुतिन यांनी कुराणचं चुंबन घेतलं! मशिदीमधील PHOTOS जगभरात व्हायरल; कारण..

Putin kisses Quran: जगातील सर्वात शक्तीशाली नेत्यांच्या यादीमध्ये असलेल्या व्लादिमीर पुतिन यांनी केलेली ही कृती अनेकांचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. जगभरामध्ये सध्या पुतिन यांच्या या कृतीची चर्चा असून एका मशिदीमध्ये त्यांनी ही कृती केल्याने फोटो व्हायरल झाले आहेत. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं...

| Aug 23, 2024, 13:57 PM IST
1/11

PutinKissesQuran

आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जाणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या कुराणचं चुंबन घेतल्या मुळे चर्चेत आहेत.

2/11

PutinKissesQuran

पुतिन यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार पुतिन हे सध्या चेचन्या प्रजासत्ताक या देशाच्या दौऱ्यावर आहेत.  

3/11

PutinKissesQuran

या दौऱ्यामध्ये पुतिन यांनी ग्रोज्नीमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या 'पैगंबर जीसस' मशिदीला भेट दिली.   

4/11

PutinKissesQuran

पुतिन यांनी या मशिदीला भेट दिली तेव्हा यांच्याबरोबर चेचन्या प्रजासत्ताकचे प्रमुख रमझान कादिरोव आणि चेचन्याचे प्रमुख मुफ्ती सालाह मेझिएव सुद्धा उपस्थित होते.  

5/11

PutinKissesQuran

नव्याने उभारण्यात आलेल्या या मशिदीची माहिती पुतिन यांनी घेतली. त्यांनी सविस्तरपणे या मशिदीची रचना कशी आहे यासंदर्भात जाणून घेतलं.  

6/11

PutinKissesQuran

पुतिन यांच्या या मशिद भेटीदरम्यान त्यांना इस्लाम धर्मियांमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या कुराणची एक गोल्डन प्लेटेड अवृत्ती भेट देण्यात आली.   

7/11

PutinKissesQuran

स्वत: ऑर्थडॉक्स ख्रिशन असलेल्या पुतिन यांनी आधी कुराणची ही प्रत पाहिली. त्यांना ती सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी या प्रतीचं चुंबन घेतलं.   

8/11

PutinKissesQuran

पुतिन यांनी कुराणाच्या प्रतीचं चुंबन घेतल्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.  

9/11

PutinKissesQuran

अनेकांनी पुतिन यांची ही कृती त्यांचे मुस्लीमबहुल देशांबरोबर उत्तम आणि जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित होतात असं म्हटलं आहे.  

10/11

PutinKissesQuran

पुतिन यांनी जगभरातील वेगवेगळ्या मुस्लीमबहुल देशांचे दौरे यापूर्वीही केले आहेत. 

11/11

PutinKissesQuran

याचनिमित्ताने पुतिन यांचा 2023 मधील एका मशिदीच्या भेटीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावेळीही त्यांनी कुराणची प्रत हातात घेऊन, 'कुराण मुस्लिमांसाठी पवित्र धर्मग्रंथ आहे. तो इतरांनीही त्याचा सन्मान केला पाहिजे,' अशा अर्थाचं मत नोंदवलं होतं.