राज्यातील 'या' मतदारसंघात 4822 विद्यार्थ्यांना मिळाल्या मोफत सायकल! कारण जाणून कराल कौतुक

Cycle Distribution To Students: या मोहिमेअंतर्गत सायकल मिळालेल्या एका आठवीच्या मुलीने एक छान पत्र या आमदाराला लिहिलं असून त्यामध्ये तिने या आमदाराचा उल्लेख आमच्या भविष्याचे दूत असा केला आहे. जाणून घेऊयात या मोहिमेबद्दलची सविस्तर माहिती...

| Apr 03, 2023, 17:22 PM IST
1/6

Rohit Pawar Cycle Distribution

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघांमधील शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम सुरु केला आहे. यासंदर्भातील फोटो रोहित पवार यांनीच शेअर केले आहेत. (सर्व फोटो - Twitter/RRPSpeaks वरुन साभार)

2/6

Rohit Pawar Cycle Distribution

रोहित पवार यांच्याकडून विशेष कारणासाठी या विद्यार्थ्यांना सायकल वाटप केलं जात आहे. रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात आतापर्यंत कर्जत तालुक्यातील 16 शाळांमधील 1260 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आलं आहे.

3/6

Rohit Pawar Cycle Distribution

तर जामखेड तालुक्यात 47 शाळांमधील 3562 विद्यार्थ्यांसाठी शाळेत जाऊन सायकल देण्यात आल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

4/6

Rohit Pawar Cycle Distribution

आता या इतक्या म्हणजेच 4822 सायकलींचं वाटप करण्यामागील कारण म्हणजे हे विद्यार्थी शाळेत येण्यासाठी 3 किमीहून अधिकचा प्रवास करतात. या विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या साकलींचं वाटप केलं जात आहे.

5/6

Rohit Pawar Cycle Distribution

कर्जत-जामखेड मतदारसंघात शाळेपासून ३ कि.मी. पेक्षा अधिक लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकल देण्याचा उपक्रम वेगात सुरू आहे, असा उल्लेख रोहित यांच्या पोस्टमध्ये आहे.

6/6

Rohit Pawar Cycle Distribution

अशी सायकल मिळालेल्या तृपी थेटे नावाच्या 8 वीच्या विद्यार्थीने रोहित पवारांना पत्र पाठवलं आहे. हे पत्रही रोहित पवार यांनी शेअर केलं आहे. "तृप्तीसारख्या हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणं यांच्यासारखं दुसरं समाधान नाही. हे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल खरं म्हणणे मीच या मुलांचे आभार मानायला हवेत!" असं रोहित पवार म्हणाले.