Rishabh Pant Car Accident : पाठीवर जखमा, पायाला गंभीर दुखापत…ऋषभ पंतच्या अपघाताचे फोटो पाहिले तर...

 टीम इंडियाचा स्टार खेळाडू विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीला आज (30 डिसेंबर) भीषण अपघात झाला. 

Dec 30, 2022, 14:28 PM IST

Rishabh Pant Car Accident Photo Viral :  टीम इंडियाचा स्टार खेळाडू विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीला आज (30 डिसेंबर) भीषण अपघात झाला. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या डोक्याला देखील मार लागला आहे. या अपघाताचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

1/5

भारतीय क्रिकेटपटू  ऋषभ पंतच्या कारचा अपघात शुक्रवारी, पहाटे 5.15 च्या सुमारास झाला.  रुडकी येथील नारसन बॉर्डरवर हम्मदपूर झाल जवळ त्यांची गाडी रेलिंगला धडकली.  या अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

2/5

ऋषभ पंतला रुरकी येथील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ऋषभची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

3/5

या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पाठीवर खोल जखमा आहेत. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परिणामी त्याची प्लास्टिक सर्जरी करण्याबाबत डॉक्टर बोलत आहेत.

4/5

ऋषभ पंतसोबत झालेल्या कार अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. पंतच्या रुग्णालयात दाखल झालेल्यांचे फोटोही पाहता येतील. डॉक्टरांनी सांगितले की, पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

5/5

25 वर्षीय ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली. या अपघातानंतर त्यांच्या गाडीला भीषण आग लागली. ऋषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.