PHOTO : हिंद महासागरातील हे बेट सुंदर असूनही अतिशय धोकादायक, पाण्यात पोहायला लोकांना वाटते भीती

हिंद महासागरातील रियुनियन बेट हे अतिशय सुंदर असं बेट असून नैसर्गाने नटलेले हे बेट जलतरणपटू आणि सर्फरसाठी अतिशय धोकादायक मानलं जातं. इथे लोकांना पाण्यात जाण्याची भीती वाटते. पण या बेटावरील लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत. 

Jun 11, 2024, 16:43 PM IST
1/6

सुंदर दृश्ये आणि आकर्षक समुद्रकिनारे असूनही, रियुनियन बेट त्याच्या पाण्याखाली धोकादायक रहस्य लपवलंय. शार्कने हे बेट घेरलेले आहे. त्यामुळे जलतरणपटू आणि सर्फरसाठी हा सर्वात धोकादायक बेट मानला जातो. हिंदी महासागराच्या मध्यभागी वसलेले हे बेट त्याच्या अनेक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. 

2/6

रियुनियन बेटाचा सक्रिय ज्वालामुखी ले पिटोन डे ला फोरनेज 1640 पासून शंभरहून अधिक वेळा उद्रेक झालाय. जेव्हा त्यातून धूर निघतो तेव्हा तो संपूर्ण बेटावरून दिसून येतो. त्याची एकूण किनारपट्टी फक्त 207 किमी असून इथे वाहणारा लावा लोक विशेष मानत नसून तो अगदी सुरक्षित आहे, असं त्यांचं मानं आहे. कारण जळणारा लावा हा थेट समुद्रात वाहतो. खरं तर, सक्रिय आणि सुप्त ज्वालामुखी या दोघांनी बेटाला आकार दिलाय. 

3/6

रियुनियन बेट हा फ्रेंच प्रदेशात असला तरी इथे फ्रान्स, मोझांबिक, भारत, चीन, मादागास्कर आणि कोमोरोस ही लोक राहतात. हे अनेक संस्कृतींच्या संयोगाने हे ठिकाण पूर्णपणे अद्वितीय बनलंय. अनेक देशांचे सण इथे साजरे होतात. 

4/6

रियुनियन बेटाची खासियत म्हणजे लावा प्रवाहाने बनवलेले बोगदे. यामुळेच रियुनियन बेट हे जगातील सर्वात अनोखे बेट मानले गेले आहे. या बोगद्यांमधून अनपेक्षित आणि नेत्रदीपक प्रवास केल्याने बेटाची भूगर्भीय रहस्ये उलगडतात. लाव्हाचा वरचा थर थंड झाल्यावर आणि मॅग्मा सतत वाहत राहिल्यावर ते तयार झाले. 

5/6

रियुनियन बेटाच्या मध्यभागी लपलेली गावे असून पर्वतांमध्ये इतकी दुर्गम आणि उंच आहे की बेकरी आणि किराणा दुकानांना हेलिकॉप्टरने पुरवठा करावा लागतो. इथे फक्त पायी किंवा हेलिकॉप्टरने पोहोचता येते. या ठिकाणचे सुरुवातीचे रहिवासी हे पळालेले गुलाम होते. त्यांनी ही दुर्गम ठिकाणे त्यांचा आश्रय म्हणून निवडली कारण तिथे पोहोचणे फार कठीण होते.

6/6

रियुनियन हे राष्ट्रीय उद्यान आणि जागतिक वारसा स्थळ असून हे फार कमी लोकांना माहितीय. ज्वालामुखीची शिखरे आणि दऱ्या पावसाची जंगले, धुके असलेले दलदल आणि पाऊस बहुतेक वेळा इथे वाळवंट अतिशय अद्वितीय बनवतात.