मुकेश अंबानींची Salary किती? रिलायन्सनेच सांगितला आकडा; या वर्षीचा पगार पाहून बसेल धक्का

Mukesh Ambani Salary Fiscal Year 2024: रिलायन्स इंडस्ट्रीजने जारी केलेल्या अहवालामध्ये संपूर्ण अंबानी कुटुंबियांना कंपनीने नेमके किती पैसे वेतन म्हणून दिले याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये नीता अंबानींबरोबरच मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना किती पैसे कंपनीने दिले याची माहिती उघड झाली आहे. याचबद्दल जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Aug 19, 2024, 11:02 AM IST
1/8

Mukesh Ambani Salary

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि कार्यकारी निर्देशक मुकेश अंबानी यांच्या पगाराची आकडेवारी समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये त्यांनी आतापर्यंत किती पगार घेतला आहे हे कंपनीच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.

2/8

Mukesh Ambani Salary

आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी मागील तीन वर्षांपासून पगारासंदर्भात सुरु केलेली पद्धत सलग चौथ्या वर्षीही सुरु ठेवली आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुकेश अंबानी यांनी आपल्या पगारासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्याच निर्णयावर ते सलग चौथ्या वर्षीही कायम आहेत, हे आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे.  

3/8

Mukesh Ambani Salary

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक अहवालामध्ये कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किती पगार घेतला याची आकडेवारी देण्यात आली आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ झाली आहे. मात्र या साऱ्यामध्ये मुकेश अंबानींच्या पगाराचा आकडा सर्वसामान्यांना थक्क करणारा आहे. 

4/8

Mukesh Ambani Salary

मुकेश अंबानींचे नातेवाईक असलेल्या निखील आणि हेतल मेसवाणी यांच्याबरोबरच कार्यकारी निर्देशक पीएमएस प्रसाद यांनाही घसघशीत पगारवाढ मिळाली आहे. निखिल मेसवाणी यांना 25 कोटी 31 लाख पगार मिळाला आहे. तर हेतल मेसवाणी यांना 25 कोटी 42 लाख पगार मिळाला आहे. मागील आर्थिक वर्षात या दोघांचा पगार 25 कोटी इतका होता. पीएमएस प्रसाद यांचा पगार 17 कोटी 93 लाख इतका झाला आहे.

5/8

Mukesh Ambani Salary

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर्सच्या मानधनामध्येही बदल झाला आहे. अनिल अंबानींच्या पत्नी नीता अंबानी या कंपनीच्या नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर असून त्या 28 ऑगस्ट 2023 पर्यंत बोर्डाच्या सदस्य होत्या. त्यांना बैठकींसाठी उपस्थित राहिल्याच्या फी म्हणून 2 लाख रुपये आणि आर्थिक वर्षाचं कमिशन म्हणून 97 लाख रुपये मिळाले आहेत.

6/8

Mukesh Ambani Salary

ऑक्टोबर 2024 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डमध्ये सहभागी करुन घेण्यात आलेले मुकेश अंबानींची तिन्ही मुलं म्हणजेच इशा, आकाश आणि अनंत अंबानी यांना पगार म्हणून एक रुपयाही मिळालेला नाही. त्यांना बैठकींना उपस्थित राहिल्याचे प्रत्येकी 4 लाख रुपये आणि कमिशन म्हणून 97 लाख रुपये मिळाले आहेत.

7/8

Mukesh Ambani Salary

आता मुकेश अंबानींना किती पगार मिळाला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की या आर्थिक वर्षात मुकेश अंबानींनी कंपनीकडून एक पैसाही वेतन म्हणून घेतलेलं नाही. 2020 पासून मुकेश अंबानी कंपनीकडून पगार घेत नसून इतर गुंतवणूक आणि इतर माध्यमांमधून ते अर्थार्जन करतात. 

8/8

Mukesh Ambani Salary

11 हजार 430 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असून ते स्वत:च्या कंपनीकडून एक पैसाही पगार म्हणून घेत नाही. बरं हे असं ते मागील चार वर्षापासून करत आहेत. म्हणजेच रिलायन्समधून थेट पगाराच्या माध्यमातून कमाईचा विचार केल्यास मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांची पत्नी आणि मुले अधिक पैसे कमवतात असं म्हणता येईल.