...तर बँकांना दिवसाला 10 हजारांचा दंड; कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या हिताचा निर्णय

पूर्ण कर्ज फेडल्यास तारण ठेवलेली कागदपत्रं ३० दिवसांत परत देणं बँकांना बंधनकारक करण्यात आलेय. टाळाटाळ केल्यास दिवसाला पाच हजारांचा दंड भरावा लागणार आहे. 

Sep 13, 2023, 21:32 PM IST

RBI :  बँकेकडून घेतलेलं गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा तारण कर्ज फेडलं तर संबंधित बँकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेची कागदपत्रं 30 दिवसांत ग्राहकाला परत करावी लागणार आहेत. तसा आदेश रिझर्व्ह बँकेनं जारी केलाय. महत्त्वाची बाब म्हणजे कागदपत्रं देण्यास टाळाटाळ करणा-या बँकांना दररोज 5 हजार रुपये याप्रमाणं दंड आकारण्याचा सज्जड इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 

1/7

कर्जदार किंवा मृताच्या वारसांना मिळणार कागदपत्रे. 

2/7

बँकांकडून विविध प्रकारची कर्जं घेणा-या ग्राहकांना दिलासा. 

3/7

गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा तारण कर्जासाठी नवा नियम. 

4/7

कागदपत्रं देण्यास टाळाटाळ करणा-या बँकांना दररोज ५ हजारांचा दंड. 

5/7

कागदपत्रं देण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई.

6/7

मालमत्तेची कागदपत्रं ३० दिवसांत ग्राहकाला परत करण्याचे आदेश. 

7/7

कर्ज फेडणाऱ्या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा.