Relationship : तुमचा पार्टनर तुमच्यासोबत खरंच कमिटेड आहे का? कसं ओळखाल, 5 टिप्स येतील कामी...

ती व्यक्ती खरचं आपल्यासोबत कमिटेड आहे का कि आपल्याला फसवतोय हे बऱ्याचदा कळत नाही, आणि कसं समजून घ्यायचं याचासुद्धा काही अंदाज येत नाही आणि आपण गोंधळून जातो पण काही खास टिप्स आहेत ज्या तुम्हाला मदत करतील. 

Dec 29, 2022, 14:14 PM IST

कुठलंही नातं म्हटलं तर त्यात विश्वास, प्रेम, समजूतदारपणा हवाच.  आपल्या पार्टनरच्या सर्वच गोष्टी आपल्याला आवडतील असं नाही, कधी कधी काही खटके उडतात आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात आणि मग नात्यात दुरावा येऊ लागतो. 
पण काही नात्यांमध्ये याच विश्वासाच्या जोरावर लग्नगाठ बांधण्यापर्यंत विचार केला जातो तसे निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला कन्फर्म करून घ्यायच्या असतात, आपण ज्या व्यक्तीसोबत राहतोय भविष्याची स्वप्न पाहतोय 

1/5

एकमेकांना आधार द्या जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत तेव्हा एकमेकांना सपोर्ट कारण आणि देणं खूप महत्वाचं आहे. जोडीदारासोबत एकनिष्ठ राहा. जेव्हा तुम्हाला खरचं गरज असते तेव्हा जोडीदार उपस्थित असतो का हे पाहा. 

2/5

वाईट काळात सोबत उभे राहणे   प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट दिवस येतात पण आपल्या वाईट काळात जो आपल्यासोबत खंबीरपणे उभा राहील तोच खरा जोडीदार असेल हे लक्षात ठेवा . आणि हा पार्टनर पुढे कधीच तुमची साथ सोडणार नाही. 

3/5

सिक्रेट शेअरिंग हवं खऱ्या रिलेशनमध्ये जोडीदार एकमेकांपासून कधीच काही लपवत नाहीत आपली प्रत्येक गोष्ट आपल्या जोडीदाराला जो सांगतो टो खर्च प्रामाणिक जोडीदार आहे हे लक्षात ठेवा तरच टो व्यक्ती त्या नात्यात सिरीयस आहे असं समजावं. 

4/5

भविष्याविषयी बोलू काही  तुमचा पार्टनर जर तुमच्यासोबत सिरीयस असेल तर तो व्यक्ती तुमच्यासोबत भविष्याबाबतीत अनेक प्लॅन्स शेअर करेल आणि आपल्या घरच्यांसोबत ओळख करून देईल. 

5/5

एकमेकांसोबत वेळ घालवा  तुम्ही एकमेकांसोबत शक्य तेवढा जास्त वेळ घालवा; जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत वेळ घालवताना संकोच करत असेल तुम्हाला तालात असेल तर मात्र ही धोक्याची घंटा आहे हे लक्षात ठेवा