Ramadan Mubarak Wishes: नात्यांची वीण आणखी घट्ट करत मित्रपरिवाराला द्या रमजानच्या चंद्राइतक्या देखण्या शुभेच्छा
Ramadan Mubabrak Wishes: पवित्र रमजान महिना नुकताच सुरु झाला आहे. संपूर्ण जगभरात विविध वेळांवर रमजानच्या निमित्तानं रोझे ठेवले जात आहेत. याच निमित्तानं भेटीगाठीही होत आहेत.
Ramadan Mubarak Wishes: देशभरातच नव्हे, तर संपूर्ण जगात रमजानचा पवित्र महिना आणि त्यानिमित्तानं ठेवले जाणारे रोझे सुरु झाले आहेत. मुस्लिम धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र अशा या महिन्याची रंगत सध्या ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. इफ्तारीच्या निमित्तानं कुटुंबच्या कुटुंब एकत्र येत आहेत. मित्रपरिवारांच्या भेटीगाठीसुद्धा होताना दिसत आहेत. रमजानचा एक एक दिवस पुढे जाईल तसतसं हे भेटीगाठींचं प्रमाण वाढेल आणि अर्थातच एकमेकांवर शुभेच्छांचीही उधळण केली जाणार आहे. तुम्हीही मित्रपरिवाराला रमजानच्या सुरेख आणि चंद्राइतक्या देखण्या शुभेच्छा देऊ इच्छिता का? पाहा त्यासाठीचे काही एकाहून एक सरस पर्याय...