राखी सावंत बळजबरी चुंबन प्रकरण 17 वर्षांनंतर मुंबई कोर्टात, मिका सिंगकडून FIR रद्द करण्याची मागणी

Mika Singh And Rakhi Sawant: ही गोष्ट आजची नाही तब्बल 17 वर्षांनंतर झाली. जेव्हा गायक मिका सिंग आणि अभिनेत्री राखी सावंत फ्रेंड होते. मिका सिंगच्या वाढदिवसाला गायकाने अचानक राखीला किस केली. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 

Apr 11, 2023, 13:37 PM IST

Mika Singh And Rakhi Sawant : गायक मिका सिंग आणि राखी सावंत यांचा किस प्रकरण पुन्हा एकदा चर्चे आलं आहे आणि तेही 17 वर्षांनंतर...यामुळे राखी सावंतची जोरदार चर्चा होते आहे. सोशल मीडियावर रेखा सावंत सतत चर्चेत असते. मिका सिंगने त्याचा बर्थडे पार्टीमध्ये राखी सावंतला जबरदस्ती किस केली होती. या घटनेनंतर राखीने पोलिसात मिकाविरोधात तक्रार दाखल केली होती. 

1/8

आता मिका सिंगने राखी सावंतने दाखल केलेली FIR रद्द करण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात त्याने याचिका केली आहे. 

2/8

आता मिका सिंगने राखी सावंतने दाखल केलेली FIR रद्द करण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात त्याने याचिका केली आहे. 

3/8

मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. खंडपीठाने पुढील आठवड्यात पुन्हा सुनवाणी होणार असल्याचं सांगितलं.  पुढील आठवड्यापर्यंत नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

4/8

कोर्टात मिकाचा वकीलाने बाजू मांडताना म्हटलं की, ''मिका आता कामात बिझी आहे. तो हे प्रकरण कधीच विसरला आहे. त्यामुळे तिच्या विरोधातील तक्रार रद्द करण्यात यावी.''

5/8

''राखी सावंत सध्या कामात खूप बिझी आहे. या दोघांनी हे प्रकरण मिटवलं आहे, त्यामुळे ही तक्रार रद्द केल्यास काही हरकत नाही'', असं राखीचे वकील आयुष पासबोला यांनी कोर्टात म्हटले. 

6/8

17 वर्षांपूर्वी म्हणजे 2006 ची गोष्ट होती. मिका सिंह यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राखी सावंत आली होती. त्यावेळी केक कट केल्यानंतर अचानक मिकाने राखीला जबरदस्ती किस केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

7/8

यावेळी मुंबई पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली मिकाला अटकही केली होती. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. 

8/8

मिकाने आतापर्यंत अनेक हिट गाणे गायली आहेत. 'पार्टी तो बनती है', 'सुबह होने न दे', गंदी बात, वीर दी वेडिंग यासारखे अनेक गाणी गायली आहेत.