Rahul Gandhi : ट्रॅक्टर चालवला, भातलावणी केली; पवारांच्या भेटीनंतर राहुल गांधी थेट वावरात!

भारत हा आजही कृषीप्रधान देश मानला जातो. जगाचं पोट भरवण्याची ताकद देशातील बळीराजाकडे आहे. त्यामुळे शेतीशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतात राबताना दिसून आले आहेत.

Jul 08, 2023, 18:35 PM IST

Rahul Gandhi In Farm: भारत हा आजही कृषीप्रधान देश मानला जातो. जगाचं पोट भरवण्याची ताकद देशातील बळीराजाकडे आहे. त्यामुळे शेतीशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतात राबताना दिसून आले आहेत.

1/6

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची कार्यपद्धती आणि इमेज सामान्य लोकांमध्ये बदलल्याचं पहायला मिळंतय. हरियाणातील सोनीपतमधल्या मदिना गावात राहुल गांधी शेतात राबताना दिसले. 

2/6

राहुल गांधी यांनी सोनीपतमध्ये शेतकर्‍यांसह शेतात भाताची लागवड केली. तसंच ट्रॅक्टर चालवून शेतात नांगरणी देखील केली.

3/6

राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या बरोदा विधानसभा मतदारसंघातील मदिना गावात पोहोचले. त्यावेळी त्यांनी शेतमजुरांशी चर्चा केली.

4/6

काँग्रेसचे आमदार इंदुराज नरवाल आणि गोहानाचे आमदार जगबीर मलिक धावत मदिना गावात पोहोचले. राहुल गांधी अचानक आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

5/6

राहुल गांधी शेतात भाताच्या रोपांची लावणी करताना देखील दिसून आले. राहुल गांधी आल्यानं शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण दिसून आलं.

6/6

राहुल गांधी पोहोचताच गर्दी झाली होती. लोकं हातातील कामं सोडून राहुल गांधींना भेटण्यासाठी गेली होती