Amritpal Singh : अमित शाह यांना धमकी देणारा अमृतपाल सिंग कोण आहे?

Who is Amritpal Singh : पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग याला नकोदरनजीक ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर राज्यभरातील इंटरनेट आणि एसएमएस सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.

Mar 19, 2023, 10:33 AM IST

पंजाब पोलीस खलिस्तानी समर्थक आणि 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग यांच्यावर कडक कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. अमृतपालचा फायनान्सर दलजीत सिंग कलसी, अनेक अंगरक्षकांसह 78 जणांना अटक करण्यात आली आहे.

1/7

Who is Amritpal Singh

जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवाल तेव्हा मी राज्यघटनेवर विश्वास ठेवीन. मी भारतीय नाही, मी पंजाबी आहे. पूर्वी पंजाबचे राज्य असलेले संपूर्ण क्षेत्र आम्हाला हवे आहे. आधी ते भारताकडून घेऊ आणि नंतर पाकिस्तानात जाऊ, असे अमृतपाल सिंगने म्हणतो.

2/7

 Amritpal Singh Waris Punjab De chief

अमृतपाल सिंगला खलिस्तानी नेता जर्नेल सिंग भिंद्रनवाले 2.0 म्हटले जात आहे. तर काहींचा दावा आहे की ते हेतुपुरस्सर त्याला पुढे आणण्यात आले आहे.

3/7

Amritpal Singh Khalsa

भारतापासून वेगळे होऊन शीख धर्माच्या लोकांसाठी खलिस्तान निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा 29 वर्षीय अमृतपाल सिंग खालसा सहा महिन्यांपूर्वी पूर्ण शीखही नव्हता.

4/7

waris de punjab amritpal sing

खलिस्तानची मागणी करणाऱ्या 'वारीस पंजाब दे' या संघटनेचा अमृतपाल सिंग प्रमुख आहे. त्याच्या इतर मागण्यांमध्ये अमली पदार्थमुक्त पंजाब आणि शीख सार्वभौमत्व यांचाही समावेश आहे.

5/7

amritpal sing attcak police station

अमृतपाल सिंगने 23 फेब्रुवारी रोजी हजारो शिखांसह, अजनाळा तुरुंगातील लवप्रीत 'तुफान' याला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यावर धडक दिली होती. त्यानंतर तो चर्चेत आला होता.

6/7

amit shah vs amritpal sing

10 दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी  त्यांचे सरकार खलिस्तान चळवळ उखडून टाकेल असे म्हटले होते. यावर अमृतपाल सिंगने 2006 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत खलिस्तानच्या बाजूने शांततेने बोलणे हा गुन्हा नाही असे म्हटले होते.

7/7

amritpal sing warn amit shah

अमित शाह जे म्हणाले होते तेच इंदिरा गांधींनी सांगितले होते आणि त्याचा परिणाम त्यांच्यासाठीही तसाच होऊ शकतो, असे अमृतपालने म्हटले होते. अमृतपाल सिंह यांनी अमित शहांना हिंदु राष्ट्राची मागणी करणाऱ्यांना हेच सांगण्यास सांगितले होते.