Met Gala 2018: देसी गर्ल की मस्तानी रेड कार्पेटवर कोणाची जादू?

May 08, 2018, 11:53 AM IST
1/8

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

न्युयॉर्कमध्ये काल रात्रीची सुरुवात स्टार्सच्या झगमगाटात सुरु झाली. न्युयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या Met Gala 2018 च्या रेड कारपेटवर स्टार्सचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. कारण यावेळेसची थीम होती हैवनली बॉडीजः फॅशनल अॅँड द कॅथोलिक इमॅजिनेशन. फोटो सौजन्य- shaleenanathani/Twitter  

2/8

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

इंटरनॅशलन सेलिब्रेटींच्यामध्ये बॉलिवूडमधली दोन सौंदर्यवतींनी आपला जलवा दाखवला. मेट गाला २०१८ च्या रेड कारपेटवर प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोणने जबरदस्त एंट्री घेतली.  

3/8

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

गेल्या वर्षी मेट गालामध्ये प्रियंकाने सुंदर कॉलर असलेला एक गाऊन घातला होता. त्या गाऊनमुळे प्रियंका स्तुतीस पात्र ठरली तर काहींनी टिकाही केली. फोटो सौजन्य- @team_pc_/Twitter  

4/8

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

यावर्षी प्रियंका फॅशन डिजाईनर राल्फ लॉरेनच्या वेलवेट गाऊनमध्ये दिसली. मरुन रंगाच्या स्ट्रेपलेस वेलवेट गाऊनसोबत प्रियंकाने गोल्डन रंगाचा हुडी टोप घातला होता. डिजाईनर रॉल्फ लॉरेनचा हा गाऊन अनेक रंगीबेरंगी मोत्यांनी सजवला होता आणि तो पूर्णपणे हाताने बनवला होता. फोटो सौजन्य- @team_pc_/Twitter  

5/8

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

या इवेंटमधील प्रियंकाचे हे तिसरे वर्ष आहे. सध्या प्रियंका आपल्या अमेरिकन टी.व्ही. सिरीयल क्‍वांटिको 3 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. फोटो सौजन्य- @team_pc_/Twitter

6/8

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

तर बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणही या इवेंटमध्ये सहभागी झाली. एक शोल्डर ऑफ आणि दुसऱ्या शोल्डरवरुन थोडे वर डिझाईन असलेला रेड रंगाचा गाऊन तिने परिधान केला होता. दीपिकाचा हा गाऊन प्रबल गुरुंगने डिझाईन केला होता. तर हेअर स्टायलिस्ट हॅरी जोशने तिचा लूक खुलवला होता. फोटो सौजन्य- @sandhyashekar/Instagram  

7/8

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

सर्वांना एकत्र आणणाऱ्या या इवेंटचे आयोजन न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले होते. या इवेंटमधून एकत्रित झालेला निधी न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटियन म्‍यूजियम ऑफ आर्टसाठी वापरण्यात येणार आहे. फोटो सौजन्य-  @team_pc_/Twitter  

8/8

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

Priyanka Chopra or Deepika Padukone, Who`s Best Dress at the 2018 Met Gala

दीपिका या इवेंटमध्ये दुसऱ्यांदा सहभागी झाली. तर प्रियंकाचे हे तिसरे वर्ष होते. तर या दोन्हींपैकी कोणाचा लूक तुम्हाला अधिक आवडला?