पंतप्रधान मोदींची संपत्ती किती? कुठे ठेवतात पैसा...

पीएमओनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चल-अचल संपत्ती जाहीर केलीय. पीएमओकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या पीएम नरेंद्र मोदी यांच्याकडे जवळपास 2.3 करोडची संपत्ती आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधानांजवळ जवळपास दीड करोडची संपत्ती होती. चार वर्षानंतर पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत जवळपास 75 लाख रुपयांची वाढ झालीय

Sep 20, 2018, 13:36 PM IST
1/7

कर्ज घेतलेलं नाही

कर्ज घेतलेलं नाही

2014 मध्ये पंतप्रधानांकडे चल-अल संपत्ती 1 करोड 51 लाख 582 रुपये होती... आणि 2018 मध्ये त्यांच्याकडे 2.28 करोड रुपयांची संपत्ती आहे. 31 मार्च 2018 पर्यंतच्या पंतप्रधानांच्या संपत्तीचा खुलासा पीएमओनं केलाय. सोबतच त्यांनी कोणत्याही बँकेकडून कोणतंही लोन घेतलेलं नसल्याचंही यात म्हटलं गेलंय. 

2/7

पंतप्रधानांकडे कॅश किती

पंतप्रधानांकडे कॅश किती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण 48 हजार 944 रुपयांची कॅश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 67 टक्के कमी झालाय. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्याकडे 1 लाख 50 हजार रुपये कॅशमध्ये होते. याशिवाय गांधीनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रान्चमध्ये 11.3 लाख रुपये जमा आहेत. 

3/7

कुठे केलीय गुंतवणूक

कुठे केलीय गुंतवणूक

पंतप्रधान मोदी पैशांच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेत नाही. त्यांनी आपल्या मिळकतीमधील जास्तीत जास्त पैसा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवलाय. त्यांनी स्टेट बँकमध्ये 1.07 करोडची एफडी केलीय. याशिवाय त्यांनी 2012 पासून इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डमध्ये 20,000 रुपयांची गुंतवणूक केलीय. टॅक्स सेव्हिंग्ससाठी पंतप्रधानांनी एलएन्डटी इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड खरेदी केला होता. 

4/7

जीवन विमा

जीवन विमा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या इतर गुंतवणुकीत नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा समावेश आहे. यात त्यांनी 5.20 लाख रुपयांची गुंतवणूक केलीय. याशिवाय 1.60 लाख रुपयांचा जीवन विमाही त्यांच्या नावावर आहे. 

5/7

सोन्याच्या अंगठ्या

सोन्याच्या अंगठ्या

पंतप्रधान मोदी यांची केवळ हीच गुंतवणूक नाही तर त्यांनी सोन्यातही गुंतवणूक केलीय. पंतप्रधान मोदींकडे 1.38 लाख रुपयांची ज्वेलरी आहे. यात त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत ज्यांचं वजन 45 ग्राम आहे. पंतप्रधान बनल्यानंतर मात्र मोदींनी कोणतेही दागिने विकत घेतलेले नाहीत. 

6/7

एक करोड रुपयांचं घर

एक करोड रुपयांचं घर

अचल संपत्तीमध्ये पंतप्रधान मोदींकडे एक घर आहे. तेदेखील गुजरातमध्ये... पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये 3500 स्क्वेअर फूटमध्ये बनलंय. त्यांनी हे घर 2002 मध्ये विकत घेतलं होतं. त्यावेळ या घराची किंमत होती 1 लाख 30 हजार रुपये... परंतु, सध्या मात्र या घराची किंमत एक करोड रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. 

7/7

मालकीची गाडी नाही

मालकीची गाडी नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपली कार नाही. पीएमओनं दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या नावावर कोणतीही गाडी, एअरक्राफ्ट किंवा यॉच नाही... पंतप्रधानांना मिळणाऱ्या ऑफिशिअल सुविधांमध्ये येणाऱ्या चार गाड्यांचा ते वापर करतात.