भारताचं नवीन विश्वविक्रम; वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ

'संकल्प से सिद्धि...'  

Jul 11, 2020, 13:22 PM IST

भारतात वाघांच्या संख्यात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे भारताने एक नवीन विश्वविक्रम निर्माण केल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. वन्यजीव सर्वेक्षण आणि आत्मनिर्भर भारताचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा आशयाचं ट्विट प्रकाश जावडेकरांनी केलं आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदींनी ४ वर्षांपूर्वी वघांची संख्या दुप्पट करण्याचा संपल्प हाती घेतला होता. त्यांनी या संकल्पास 'संकल्प से सिद्धि' असं नाव दिलं होतं.

1/5

भारताचं नवीन विश्वविक्रम; वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ

भारताचं नवीन विश्वविक्रम; वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ

जावडेकर यांनी सांगितले की, ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचा सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅप आता गिनीज बुक आणि वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाला आहे. हा कॅमेरा २६ हजार ७६० वेग-वेगळ्या जागांवर लावण्यात आला होता. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जवळपास तीन कोटींपेक्षा जास्त फोटो काढण्यात आले आहेत.  

2/5

भारताचं नवीन विश्वविक्रम; वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ

भारताचं नवीन विश्वविक्रम; वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाअंतर्गत देशात दर चार वर्षांनी व्याघ्रगणनेचा अंदाज मांडण्यात येतो. २०१८च्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. तेव्हा वाघांची संख्या ३ हजार असल्याचं सांगण्यत आलं.   

3/5

भारताचं नवीन विश्वविक्रम; वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ

भारताचं नवीन विश्वविक्रम; वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ

त्याआधी २०१४ साली केलेल्या सर्वेच्या अनुसार वाघांची संख्या २ हजार २२६ होती.   

4/5

भारताचं नवीन विश्वविक्रम; वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ

भारताचं नवीन विश्वविक्रम; वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ

२००६ साली देशात वाघांची संख्या १ हजार ४११ होती, ती २०१९ मध्ये वाढून २ हजार ९६७ झाली आहे.  

5/5

भारताचं नवीन विश्वविक्रम; वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ

भारताचं नवीन विश्वविक्रम; वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ

भारतातील ५० व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानातील ही आकडेवारी आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेल्या वाघांच्या फोटोंवरून ही आकडेवारी काढण्यात आली आहे.