रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'वैदिक थाळी'

देशभरात कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढतोच आहे. 

Aug 09, 2020, 12:22 PM IST

देशभरात कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढतोच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहेत. अशात जेव्हापासून देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली तेव्हा पासून राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक चांगली ठेवण्यासाठी ardor2.1 रेस्टोरेंटमध्ये 'वैदिक थाळी' सुरू करण्यात आली आहे.

1/5

दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील ardor 2.1 नावाच्या रेस्टॉरंटने संकटाला संधीमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला आहे. रेस्टॉरंटचा असा दावा आहे की रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध पदार्थांनी परिपूर्ण असलेली जेवनाची थाळी लोकांना कोरोनाशी लढायला मदत करेल

2/5

५ हजार वर्षांपूर्वी वैदिक युगात ज्या प्रकारे अन्न असायचं आणि शिजवलं जायचं. त्यात आधारावर वैदिक थाळी तयार करण्यात येत आहे. ज्यात लाकूड आणि कोळसा इंधन म्हणून वापरला जातो. शिवाय मातीच्या भांड्यांचा वापर अन्न शिजवण्यासाठी होतो.

3/5

वैदिक थाळी बनवणारे शेफ कैलाश यांनी सांगितले की, यामध्ये सर्व प्रकारच्या मसाल्यांचा वापर करण्यात आला आहे. मसाल्याच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 

4/5

हिरव्या भाज्या प्रामुख्याने वैदिक थाळीमध्ये वापरल्या जात आहेत. लोह, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असलेल्या भाज्या. तसेच हळद, आवळा, तुळशी,  शंखपुष्पी या आयुर्वेदिक पदार्थांचा मसाला म्हणून वापर केला गेला आहे.

5/5

एका 'वैदिक थाळीची' किंमत ५०० रूपये आहे. तर या थाळीमध्ये दोन व्यक्ती पोटभर जेवू शकतात.