अंकिता लोखंडे आईला म्हणाली, 'तेरे जैसा यार कहां...'

सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकितावर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं.  

Sep 15, 2020, 18:22 PM IST

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेवर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं. आता या दुःखातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न अंकिता करताना दिसत आहे. सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकताच अंकिताला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर ती सोशल मीडियापासून काही दिवस दूर होती. परंतु आता पुन्हा ती आपलं जीवन आनंदात जगण्याचा प्रयत्न करत आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये तिने आईचा उल्लेख 'तेरे जैसा यार कहां...' असा करत कॅप्शन दिलं आहे. आईने वेणी बाधल्यानंतर अंकिताने काही फोटो पोस्ट केले आहेत. 

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7