'तारक मेहता' आवडतं म्हणणाऱ्या अमर सेहरावतची जेठालालने घेतली भेट, दिलं खास गिफ्ट

Aman Sehrawat meets Jethalal : अमन सेहरावत हा भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पदक विजेता ठरला आहे. अमनने वयाच्या 21 वर्षे 24 दिवसांत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलंय.

Saurabh Talekar | Aug 22, 2024, 17:20 PM IST
1/5

अमन सेहरावत

कुस्ती खेळण्याव्यतिरिक्त तुला काय आवडलं? असा सवाल 21 वर्षांच्या अमन सेहरावतला जेव्हा विचारला गेला, तेव्हा अमनने मजेशीर उत्तर दिलं होतं.

2/5

तारक मेहता पहायला आवडतं...

कुस्ती खेळायला मला आवडते पण त्याशिवाय मला तारक मेहता पहायला आवडतं. मला फावला वेळ मिळाला की मी तारक मेहता पाहतो, असं अमर सेहरावतने म्हटलं होतं.

3/5

दिलीप जोशीने भेट

अशातच आता अमर सेहरावतचं स्वप्न पूर्ण झालंय. तारक मेहता सिरीयलमधील जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीने अमरची भेट घेतली.

4/5

तारक मेहता का उल्टा चष्मा

आज दिलीप जोशींना भेटून मला खूप आनंद झाला. “तारक मेहता का उल्टा चष्मा” मध्ये त्यांना पाहून मला नेहमी हसायला आलं आणि आनंद झाला, मला भेटल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, असं अमरने पोस्ट करत म्हटलंय.

5/5

फाफडा जिलेबी

दरम्यान, दिलीप जोशी यांनी अमरला खास भेटवस्तू देखील दिली. दिलीप जोशी यांनी अमरला फाफडा आणि जिलेबी भेट दिली. त्याचा फोटो अमरने शेअर केला आहे.