लहान मुलासारखं वागू नको, रडणं थांबव...मुलांसोबत बोलताना तुम्हीही हे म्हणत असाल तर थांबा

मुलांच भविष्य त्यांच्या पालकांच्या हातात असं म्हणणतात. पालकांच्या वागणुकीचा परिणाम मुलांवरही होत असतो. त्यामुळे पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अशावेळी पालकांनी मुलांसोबत संवाद साधताना कोणती काळजी घ्याल?

Jan 09, 2023, 19:24 PM IST
1/5

child behaviour

रडणं थांबव, सगळं नीट होईल असं म्हणण्याऐवजी काय झालंय, तू का रडतोस किंवा रडतेस? असे म्हणू शकता

2/5

children

लहान मुलासारखं वागू नकोस म्हणण्याऐवजी तू असं का वागतोयस? असे विचारा

3/5

child

एकच गोष्ट तुला १०० वेळा सांगायची का असं म्हणण्याऐवजी हे मी तुला आधीही सांगितलंय असं सांगून तुम्ही त्यांची समजूत काढू शकता  

4/5

parenting

मी सगळं तुझ्यासाठी करते याची सारखी जाणीव करुन देण्यापेक्षा आम्ही तुझ्यावर प्रेम करतो त्यामुळे तुझ्यासाठी सगळं करतो असेही तुम्ही सांगू शकता

5/5

children food

ही गोष्ट खाऊ नकोस त्यामुळे तू जाड होशील असे सांगण्याऐवजी  हे तुझ्या आरोग्यासाठी चांगलं नाही त्यामुळे शक्यतो ते खाणं टाळ अशा शब्दात तुम्ही समजूत काढू शकता