OnePlus TV for Rs 9899: वनप्लसचा 40 inch Smart TV केवळ 9899 रुपयांना; जाणून घ्या Offer

OnePlus Y1 40 inch Smart TV Sale: वनप्लसचा वनप्लस व्हाय वन 40 इंच स्मार्ट टीव्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर अगदी स्वस्तात उपलब्ध आहे. तुम्ही सुद्धा एखादा नवा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच या टीव्हीचा विचार करु शकता.

Feb 15, 2023, 14:37 PM IST
1/5

OnePlus TV At Rs 9899

वनप्लस व्हाय वन 40 इंच स्मार्ट टीव्हीची फ्लिपकार्टवरील ही भन्नाट डील नेमकी काय आहे तसेच त्याचे स्पेसिफिकेशन काय आहेत जाणून घेऊयात...

2/5

OnePlus TV At Rs 9899

ऑफरबद्दल बोलायचं झालं तर वनप्लस व्हाय वन 40 इंच फूल एचडी एलईडी स्मार्ट अॅण्ड्रॉइड टीव्हीची (OnePlus Y1 40 inch Full HD LED Smart Android TV) किंमत 27,999 रुपये आहे. मात्र 21 टक्के डिस्काऊंटनंतर हा टीव्ही 21,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा टीव्ही 3667 रुपये प्रति महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयवर विकत घेता येणार आहे.

3/5

OnePlus TV At Rs 9899

बँक ऑफर - बँकांकडून देण्यात आलेल्या ऑफर्समध्ये आयसीआयसीआय बँक, इंडसइंडिया बँक, वनकार्ड आणि एचएसबीसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर आणि ईएमआय ट्रानझॅक्शनवर 10 टक्के म्हणजेच 1500 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सेस बँक कार्डवरुन पेमेंट केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.

4/5

OnePlus TV At Rs 9899

एक्सचेंज ऑफर - एक्सचेंज ऑफऱमध्ये जुना टीव्ही दिल्यास 11 हजार रुपयांपर्यंत किंमत कमी होईल. अर्थात एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी एक्सचेंजमध्ये दिलेल्या टीव्हीची कंडीशन कशी आहे आणि मॉडल कोणता आहे यावर अवलंबून आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये टीव्ही दिल्यास हा नवा टीव्ही अवघ्या 10 हजार 999 रुपयांना मिळू शकतो. तसेच बँकेची ऑफरही यावर लागू झाल्यास अधिकचे 1,099 रुपये कमी होतील आणि टीव्ही 9,899 रुपयांना मिळू शकतो.

5/5

OnePlus TV At Rs 9899

वनप्लस व्हाय वन 40 इंच स्मार्ट टीव्हीमध्ये नावाप्रमाणेच 40 इंचांची फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रेझोल्यूशन 1920X1080 पिक्सल आणि 60 एचझेड रिफ्रेशन रेट आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि युट्यूबला सपोर्ट करतो. हा टीव्ही अॅण्ड्रॉइडवर काम करतो. याबरोबर गुगल असिस्टंट आणि क्रॉमकास्ट इनबिल्ट मिळतं.