नरेंद्र मोदी@70; पंतप्रधानांचे Unseen Photo

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 17 सप्टेंबर रोजी आपला 70वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

Sep 17, 2020, 11:43 AM IST

मोदींचा जन्म गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगरमध्ये हीराबेन आणि दामोदरदास मोदी यांच्या कुटुंबात झाला. आज नरेंद्र मोदी जगातील एक प्रभावशाली नेता, प्रभावी व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखले जातात. 

1/14

3 जून 1967 मध्ये मोदींनी घर सोडून हिमालय, ऋषिकेश आणि रामकृष्ण मिशनसह संपूर्ण भारतभर यात्रा केली होती.

2/14

3 ऑक्टोबर 1967 मध्ये नरेंद्र मोदी RSS मध्ये सामिल झाले.

3/14

1973मध्ये मोदींना सिद्धपूरमध्ये आयोजित एका भव्य सम्मेलनासाठी काम करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तेथे त्यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.

4/14

3 जून 1978 मध्ये मोदींना संघात अधिक जबाबदारी देण्यात आली. त्यांना 'विभाग प्रचारक' म्हणून जबाबदारी देऊन, वडोदरामध्ये काम करण्यासाठी सांगण्यात आलं होतं.

5/14

पंतप्रधान मोदींचा हा फोटो 1980च्या दशकातील आहे.

6/14

3 जून 1987 मध्ये मोदींनी निवडणूकांसाठी संघटनेच्या कामात सक्रीय भूमिका बजावली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे भाजपने AMC निवडणूकांमध्ये विजय मिळवला होता.

7/14

11 सप्टेंबर 1991 मध्ये, राष्ट्रीय एकीकरणाच्या उद्देशाने एकता यात्रा सुरु करण्यात आली होती. मोदी या एकता यात्रेचा अभिन्न भाग होते.  

8/14

5 जानेवारी 1998 रोजी नरेंद्र मोदींना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आलं.

9/14

मोदींनी 2019 मध्ये हा खास फोटो शेअर केला होता.

10/14

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह नरेंद्र मोदी...

11/14

नरेंद्र मोदींनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकहितासाठी समर्पित केलं.

12/14

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासह नरेंद्र मोदी...

13/14

नरेंद्र मोदी आपत्कालीन विरोधी आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते. अत्याचाराच्या निषेधार्थ स्थापन झालेल्या गुजरात लोक संघर्ष समितीचा (GLSS) ते एक भाग होते.  (स्रोत: narendramodi.in)

14/14

नरेंद्र मोदींनी वयाच्या आठव्या वर्षापासून आरएसएसच्या सभांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती.