फक्त डायबेटिजच नाही तर साखरेमुळे या आजारांचाही वाढतो धोका

सध्या जगभरात डायबेटिजच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. डायबेटिज होण्यामागे अन्नातून साखरेचे अतिसेवन हे प्रमुख कारण ठरते. साखर ही स्लो पॉइजन सारखी काम करते म्हणून साखरेचं किंवा साखरयुक्त पदार्थांचं सेवन मर्यदित प्रमाणामध्ये करावं असे तज्ज्ञ सांगतात. साखरेच्या अति सेवनामुळे केवळ डायबेटीजच नाही तर यामुळे अनेक इतर आजारांनाही आमंत्रण मिळतं.   

| Oct 02, 2024, 17:29 PM IST
1/6

हृदयाचे आजार :

साखरेच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, वजन वाढण्याची समस्या जाणवते. गोड पदार्थ आणि पेयांचे सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर समस्यांची शक्यता वाढते.

2/6

लठ्ठपणा :

वजन वाढण्यात साखर मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते. साखरयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि जास्त गोड खाण्याची लालसा वाढते. साखरेचे जास्त सेवन केल्याने शरीरात फॅट्स जमा होता आणि हे फॅट्स अधिकतर पोटाच्या आजूबाजूला जमा होतात. 

3/6

नॉन-अल्कोहलिक फॅटी लिव्हर रोग (एनएएफएलडी) :

साधारणपणे गोड पदार्थांमध्ये फ्रुक्टोजचे जास्त सेवन केल्याने लिव्हरवर परिणाम होतो. यामुळे नॉन-अल्कोहलिक फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. ही अशी स्थिती आहे ज्यात लिव्हरमध्ये एक्स्ट्रा फॅट्स जमा होतात. 

4/6

दात खराब होणे :

साखर तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया वाढवते, ज्यामुळे ऍसिड तयार होते आणि दातातील इनेमल खराब करते. कालांतराने, यामुळे पोकळी, दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होऊ शकतात.

5/6

अनेक संशोधनातून समोर आले आहे की जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने मेंदूच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होते आणि स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो. साखरेचे सेवन केल्याने उदासीनता आणि चिंता वाढवू शकते.

6/6

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)