आता चार नाहीत, जगभरात 5 महासागर, अंटार्क्टिका Sothern Ocean ला मिळाली मान्यता

Jun 18, 2021, 07:01 AM IST
1/5

पांचवे महासागर

पांचवे महासागर

आतापर्यंत पुस्तकात आपण जगात 6 महाद्वीर आणि 4 महासागर असल्याची माहिती वाचली. मात्र आता यामध्ये बदल झालाय. आता जगात पाचवा महासागर असल्याचं समजलं आहे. अंटार्क्टिका महाद्वीपमधील साऊदर्न सागराला महासागराची मान्यता मिळाली. 

2/5

एनजीएसने दिली मान्यता

एनजीएसने दिली मान्यता

नॅशनल जियोग्राफिक सोसायटीने आतार्यंत साउदर्न महासागर (Southern Ocean) ला मान्यता दिली आहे. या अगोदर अटलांटिक, प्रशांत, हिंद आणि आर्कटिक महासागर यांनाच महासागर म्हणून मान्यता मिळाली आहे. 

3/5

8 जून रोजी मिली मान्यता

8 जून रोजी मिली मान्यता

8 जून रोजी वर्ल्ड ओशन डेच्या दिवशी नॅशनल जियोग्राफिक सोसायटीने साउदर्न सागरला पाचव्या महासागराला मान्यता देण्यात आली आहे. साउदर्न सागरमध्ये पाणी अतिशय थंड आहे. कारण येथे फक्त बर्फाच्या भिंती, हिमखंड आणि ग्लेशियर आहे.  

4/5

आतापर्यंत होते चार महासागर

आतापर्यंत होते चार महासागर

एनजीएसचे अधिकृत जियोग्राफर एलेक्स टेट यांनी सांगितलं की, वैज्ञानिकांनी Southern Ocean ला मान्यता दिली आहे. अद्याप याबाबत आंतरराष्ट्रीय स्तारवर मान्यता मिळालेली नाही. यामुळे याला अधिकृतरित्या महासागर म्हणू शकत नाही. 

5/5

अंटार्क्टिकाकडे आहे हे महासागर

अंटार्क्टिकाकडे आहे हे महासागर

अंटार्क्टिका महासागराला देखील नकाशात 1915 साली समाविष्ट करण्यात आलं. यानंतर एनजीएसने चार महासागरांना सीमांमध्ये बांधून घेतलं. ज्यांना महाद्वीपांना सीमांच्या आधारावर नाव देण्यात आलं. साऊदर्न महासागरला कोणत्या महाद्वीरच्या नावाने बोलवलं जाणार नाही.