Rohit Sharma: चेन्नई, बंगळूरू नाही तर 'या' टीमची कमान रोहितला सांभाळायचीये, स्वतः केला खुलासा

Rohit Sharma: आयपीएलच्या पुढच्या सिझनमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार अशी अटकळ बांधली जातेय. मात्र रोहितला कोणत्या टीमचं नेतृत्व करायला आवडेल?

| Mar 20, 2024, 18:43 PM IST
1/7

आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स टीममध्ये सर्वात मोठा बदल झाला आहे. 

2/7

फ्रँचायझीने 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले.

3/7

रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे टीमची धुरा सोपवण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही पंड्या आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी या प्रश्नाचे कोणतेही उत्तर दिले नाही.

4/7

सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या चाहत्यांमध्ये कुरबुर सुरु असल्याचं पहायला मिळतंय. प्रत्येकाचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

5/7

दरम्यान रोहितचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रोहितने मुलाखत देताना अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

6/7

MI व्यतिरिक्त रोहितला आणखी कोणत्या टीमचे कर्णधार बनायला आवडेल? या प्रश्नाला उत्तर देताना रोहितने कोलकाता नाईट रायडर्सचे असं नाव सांगितलं.

7/7

रोहित शर्माने आपल्या कर्णधारपदाखाली 5 वेळा मुंबई टीमसाठी विजेतेपद पटकावलं आहे. तर पंड्याने 2 वर्ष गुजरातची कमान सांभाळली होती.