Kanya Pujan gifts: कन्या पूजनासाठी मुलींना द्या हे हटके गिफ्ट, देवीचा आशीर्वाद लाभेल

नवरात्र म्हणजे या दिवसांत नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्यापूजन केले जाते. कन्या पूजनाच्या दिवशी लहान मुलींना देवी म्हणून पुजले जाते. कन्या पूजनाच्या दिवशी घरी आलेल्या मुलींना काय गिफ्ट द्याल? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? तर आम्ही तुम्हाला आज पर्याय सांगतो

| Oct 09, 2024, 16:56 PM IST

Kanya Pujan gifts: नवरात्र म्हणजे या दिवसांत नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्यापूजन केले जाते. कन्या पूजनाच्या दिवशी लहान मुलींना देवी म्हणून पुजले जाते. कन्या पूजनाच्या दिवशी घरी आलेल्या मुलींना काय गिफ्ट द्याल? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? तर आम्ही तुम्हाला आज पर्याय सांगतो

1/7

Kanya Pujan gifts: कन्या पूजनासाठी मुलींना द्या हे हटके गिफ्ट, देवीचा आशीर्वाद लाभेल

Navratri gift ideas for kanya pujan check best gift for girls

कन्या पूजनाच्या दिवशी लहान मुलींची पूजा केली जाते. यादिवशी मुलींचे पाय धुतले जाते, त्यानंतर पायाला कुंकु लावून त्यांना आसनावर बसवतात. त्यानंतर पूजेनंतर त्यांना प्रसाद दाखवला जातो. त्यात पूरी, खीर, चणे यासारखे पदार्थ दिले जातात.

2/7

Navratri gift ideas for kanya pujan check best gift for girls

कन्या पूजन केल्यानंतर त्यांना वाण म्हणून काही गिफ्ट दिले जातात. तुमच्याकडेदेखील कन्या पूजन असेल आणि काही हटके गिफ्ट द्यायचे असेल तर हे काही पर्याय खूप चांगले आहेत.

3/7

Navratri gift ideas for kanya pujan check best gift for girls

कन्या पूजन म्हणून लहान मुलींना तुम्ही काही छान पुस्तकं वाण म्हणून देऊ शकतात. यात रामायण, महाभारत किंवा काही प्रेरणादायक पुस्तके तुम्ही देऊ शकता. 

4/7

Navratri gift ideas for kanya pujan check best gift for girls

मुलींना तुम्ही ड्रायफ्रुट्स, फळे किंवा चॉकलेट्सदेखील देऊ शकतात. हल्ली बाजारात विविध फ्लेवर्सचे ड्रायफ्रुट्सदेखील मिळतात. यामुळं मुलींना पोषणदेखील मिळेल आणि निरोगीदेखील राहाल. 

5/7

Navratri gift ideas for kanya pujan check best gift for girls

लहान मुलींना तुम्ही स्टेशनरीदेखील देऊ शकता. त्यात एक कंपास, पेन्सिल, वह्या किंवा शाळेला उपयोगी पडतील अशा वस्तु देऊ शकता. 

6/7

Navratri gift ideas for kanya pujan check best gift for girls

बाजारात हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड गेम मिळतात. तुम्ही मुलींना हे बोर्ड गेम देऊ शकतात. 

7/7

Navratri gift ideas for kanya pujan check best gift for girls

श्रृंगाराचे सामानही तुम्ही मुलींना देऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या, बांगड्या, हेअर क्लिप, हेअर बो हे तुम्ही देऊ शकता