महाराष्ट्रात आहे जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर; परदेशातून लोक ध्यान-मौनव्रत करण्यासाठी येतात

Nashik Dhamma Giri : धम्मगिरी  विपश्यना केंद्राला भेट दिल्यावर मनात सकारत्मकता निर्माण होते. 

वनिता कांबळे | Dec 03, 2024, 15:59 PM IST

Nashik Dhamma Giri,  Vipassana International Academy : जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर महाराष्ट्रात आहे. येथे परदेशातून लोक ध्यान-मौनव्रत करण्यासाठी येतात. नाशिकमध्ये असलेले विपश्यना केंद्र हे जगातील सर्वात  मोठे विपश्यना केंद्र  आहे. धम्मगिरी नावाने हे विपश्यना केंद्र ओळखले जाते. जगभरातून हजारो लोक येथे मेडिटेशन करण्यासाठी येतात. 

1/7

जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर आपल्या महाराष्ट्रात आहे.  महाष्ट्रातील नाशिकजवळ  धम्मगिरी नावाने हे विपश्यना केंद्र  आहे.  

2/7

धम्मगिरी विपश्यना केंद्र नाशिक पासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 136 किलोमीटर अंतरावर आहे. 

3/7

दहा दिवसांच्या विपश्यना शिबीरात सहभागी होण्यासाठी  विपश्यना केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवरुन नोंदणी करावी लागते.

4/7

दहा दिवसांच्या विपश्यना शिबीरात एकाग्रता आणि मानसिक शांती मिळते.  

5/7

हा दहा दिवसांचा विपश्यना अभ्यासक्रम तुमचं आयुष्य बदलेल.

6/7

या केंद्रात दहा दिवसांचा मेडिटेशन अर्थात विपश्यना अभ्यासक्रम शिकवला जातो.

7/7

धम्मगिरी हे जगातील सर्वात मोठ्या विपश्यना ध्यान केंद्रांपैकी एक आहे.