मुंबईकरांनो सावधान! 'या' 9 रस्त्यांवर वाहनं उभी करण्यास मनाई; वाहतुकीत मोठे बदल

20 जानेवारीपासून पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. 

Jan 18, 2024, 12:29 PM IST
1/11

वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा शीव स्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेकडील महत्त्वाचा उड्डाणपूल पाडण्यात येणार असून तिथे नवा पूल बांधण्यात येणार आहे.   

2/11

नव्या पुलाची बांधणी होईपर्यंत वाहतूक वळवण्यात येणार आहे. 20 जानेवारीपासून पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. दरम्यान 9 रस्त्यांवर वाहनं उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. अन्यथा कारवाईचा सामना करावा लागू शकतो.   

3/11

संत कबीर मार्ग (60 फूट) रोड, धारावी उड्डाणपूल ते केमकर चौकापर्यंत  

4/11

शीव माहीम लिंक रोड - टी जंक्शन ते माहीम फाटकपर्यंत  

5/11

माटुंगा लेबर कॅम्प - टी-एच कटारिया मार्ग (कुंभारवाडा जंक्शन ते शोभा हॉटेलपर्यंत दोन्ही मार्गिका)  

6/11

सुलोचना शेट्टी मार्ग - शीव रुग्णालय जंक्शन ते शीव रुग्णालय प्रवेश क्रमांक 7 पर्यंत  

7/11

भाऊ दाजी रोड - शीव - रुग्णालय प्रवेश क्रमांक 7 ते रेल्वे पूल  

8/11

संत रोहिदास मार्ग - पैलवान नरेश माने चौक ते वाय जंक्शन  

9/11

शीव वांद्रे लिंक रोड - वाय जंक्शन ते टी जंक्शन  

10/11

धारावी डेपो रोड - वाय जंक्शन ते कचरापट्टी जंक्शन एल.बी.एस.रोड  

11/11

के के कृष्णन मेनन मार्ग (90 फूट) - कुंभारवाडा जंक्शन ते अशोक मिल नाका दोन्ही मार्गिका