मुंबई पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई! कॅश व्हॅनमधून तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा जप्त; करोडोंमध्ये आहे किंमत

विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर भरारी पथके व पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात असताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. विक्रोळीत (Vikhroli) पोलिसांनी तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत.   

| Nov 10, 2024, 19:21 PM IST

विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर भरारी पथके व पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात असताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. विक्रोळीत (Vikhroli) पोलिसांनी तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत. 

 

1/7

विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या निवडणूक आयोग आणि मुंबई पोलीस सतर्क असून राज्यभरात कारवाई केली जात आहे.   

2/7

राज्यभरात भरारी पथकं व पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. यादरम्यान मुंबईत मोठी कारवाई केली जात आहे.   

3/7

आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत राज्यभरात 280 कोटींची रोख रक्कम जप्त केली आहे. यासह मौल्यवान वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.   

4/7

विक्रोळीत (Vikhroli) पोलिसांनी तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत.   

5/7

विकोळी पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कॅश व्हॅन पकडली असून, त्यात चांदीच्या विटा सापडल्या आहेत. या विटा एकूण साडेसहा टन इतक्या आहेत.      

6/7

व्हॅनमधील या चांदींच्या विटांची किंमत करोडोंच्या घरात आहे, या वीटा ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून मुलुंडमधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती आहे.  

7/7

पोलिसांना आढळलेल्या या वीटा अधिकृत असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मात्र, निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स आणि पोलिसांकडून याचा अधिक तपास केला जात आहे.