रोहित, ऋतिकाच्या चेहऱ्यावरील हसू हरवलं! लेकीच्या गॅदरिंगमधील 'हे' Photos पाहून चाहते चिंतेत

Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions: मुंबई इंडियन्सच्या संघाने अचानक रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून त्याच्या जागी हार्दिक पंड्याची नियुक्ती केल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे चाहत्यांना मोठा धक्का तर बसलाच मात्र सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटत आहेत. अशातच आता रोहित शर्मा आणि त्याच्या पत्नीचे लेकीच्या शाळेतील काही फोटो व्हायरल होत आहेत. जाणून घेऊयात सविस्तर...

| Dec 18, 2023, 09:29 AM IST
1/10

Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions Daughter Samaira Annual Function Fans Worried

इंडियन प्रिमिअर लिगमध्ये एकूण 11 पर्वांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मा यंदाच्या म्हणजेच 2024 च्या पर्वात संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. इंडियन प्रिमिअर लिगच्या आगामी पर्वामध्ये हार्दिक पंड्याच्या खांद्यावर संघाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा शुक्रवारी करण्यात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.

2/10

Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions Daughter Samaira Annual Function Fans Worried

5 वेळा आयपीएलच्या चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाचं नेतृत्व अचानक बदलण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्र सिंग धोनी वगळता रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आपल्या संघाला 5 वेळा चषक जिंकून दिला आहे. काही आठवड्यांपूर्वीच गुजरात टायटन्सच्या संघातून स्वगृही परतलेल्या हार्दिक पंड्यावर आता मुंबईच्या संघाने नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

3/10

Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions Daughter Samaira Annual Function Fans Worried

मुंबई इंडियन्सच्या संघाचं कर्णधारपद गेल्याची कल्पना रोहितला आधीपासूनच होती असं सांगितलं जात आहे. त्यातच आता रोहितची लेक समायराच्या गॅदरिंगमधील रोहित आणि त्याची पत्नी ऋतिकाचे फोटो समोर आले असून याचा फोटोंचा संबंध चाहते रोहितकडून कर्णधारपद काढून घेण्याशी जोडत आहेत. 

4/10

Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions Daughter Samaira Annual Function Fans Worried

लेक समायराच्या गॅदरिंगमधील रोहित आणि ऋतिकाचे फोटो पाहून चाहत्यांनी या दोघांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

5/10

Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions Daughter Samaira Annual Function Fans Worried

रोहित आणि ऋतिकाची लेक समायरा ही धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्येच शिकते.

6/10

Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions Daughter Samaira Annual Function Fans Worried

समायराने तिच्या आई-वडिलांसमोरच आपल्या शाळेतील गॅदरिंगमध्ये परफॉर्मन्स दिला.  

7/10

Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions Daughter Samaira Annual Function Fans Worried

मात्र समायराच्या डान्सपेक्षा तिचे पालक म्हणजेच रोहित आणि ऋतिका अगदी उदास होऊन कार्यक्रमात सहभागी झाल्याच्या फोटोंची सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

8/10

Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions Daughter Samaira Annual Function Fans Worried

रोहित आणि ऋतिकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर अनेकांकडून शेअर केले जात आहेत.

9/10

Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions Daughter Samaira Annual Function Fans Worried

अनेक चाहत्यांनी रोहित शर्मा फारच उदास असल्याचं म्हणत हे फोटो शेअर केले आहेत.

10/10

Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions Daughter Samaira Annual Function Fans Worried

रोहितच्या चाहत्यांनी कमेंट्स करुन आपली चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी रोहितने 2024 च्या पर्वात कोणत्या संघातून खेळायचं याचा विचार करावा असं म्हटलंय. तर एकाने रोहितला थेट अंबानींच्या शाळेतून मुलीला काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे.