Anant Ambani-Radhika Merchant : मुकेश अंबानींच्या धाकट्या मुलाचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो

Anant Radhika Wedding :  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात एकाच आठवड्यात दोन आनंदाच्या बातम्या आल्या आहेत. पहिली म्हणजे मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिनं जुळ्या मुलांना जन्म दिला. तर दुसरी बातमी म्हणजे अंबानी यांच्या घरी दोन चिमुकल्यांच्या आगमनानंतर नव्या सुनेचं आगमन होणार आहे.  

Dec 29, 2022, 17:18 PM IST

Anant Ambani-Radhika Merchant : उद्योगपती  मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची  रोका समारंभ म्हणजेच साखरपुडा आज पार पडला. राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात अंबानी आणि मर्चट कुटुंबिय तसेच मित्र मैत्रीणींच्या उपस्थित हा समारंभ पार पडला. अनंत आणि राधिका यांच्यावर सर्वांकडून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

1/5

राधिका मर्चंट (Radhika Merchant) हिच्यासोबत अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एंकोर हेल्थकेअरचे सीईओ विरेन मर्चंट यांची राधिका ही मुलगी आहे. राधिका उत्तम नृत्यांगना आहे. 

2/5

राधिका विरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. विरेन मर्चंट एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. भारतातील श्रीमंत कुटुंबांमध्ये त्यांची गणना होते. राधिकाने तिचे शिक्षण मुंबईतच पूर्ण केले आहे.  

3/5

राधिका शास्त्रीय नृत्यातही पारंगत आहे. जून 2022 मध्ये अंबानी कुटुंबाने राधिकाच्या अरंगेत्रम सेरेमनीचे आयोजन केले होते. अनेक बॉलिवुड कलाकार या सोहळ्यात सहभागी झाले होते. 

4/5

अनंत अंबानी व्यतिरिक्त, राधिकाचे नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा यांच्याशीही घट्ट नातं असल्याची चर्चा आहे. 

5/5

राधिका लग्नपूर्वीच अंबानी कुटुंबाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. आता नेटकऱ्यांनाही राधिका आणि अनंत यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.