MSRTC Strike: 12000 फेऱ्या रद्द,आर्थिक फटक्याची आकडेवारी पाहून बसेल धक्का

MSRTC Employees Strike: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंलोदनाची हाक दिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तर दुसरीकडे या आंदोलनाचा मोठा आर्थिक फटका महामंडळाला बसला आहे. पहिल्याच दिवशी महामंडळाचं किती नुकसान झालं आहे ते पाहूयात...

| Sep 04, 2024, 10:19 AM IST
1/9

msrtcstrike

आंदोनाच्या पहिल्याच दिवशी एसटी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. हा फटका नेमका कितीचा आहे ते जाणून घेऊयात आकडेवारीच्याआधारे...

2/9

msrtcstrike

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मंगळवारी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे एसटीचा चक्काजाम झाला. अचानक कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने लालपरीला ब्रेक लागला.  

3/9

msrtcstrike

एसटी कर्मचाऱ्यांच्या या कामबंद आंदोलनाचा प्रवाशांना मोठा फटका बसला. केवळ प्रवाशीच नाही तर या एका दिवसाच्या संपाचा परिणाम फार मोठा आहे. एका दिवसात नेमका एसटीच्या सेवेवर कसा परिणाम झाला हे पाहूयात ग्राफिक्सच्या मदतीने...

4/9

msrtcstrike

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी 50 टक्के वाहतूक बंद होती.  

5/9

msrtcstrike

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी एसटी बसच्या एकूण 11 हजार 943 फेऱ्या रद्द झाल्या.  

6/9

msrtcstrike

251 एसटी बस आगारांपैकी 59 बस आगारे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पूर्णपणे बंद होती.  

7/9

msrtcstrike

तर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी 77 आगारांमध्ये अंशत: वाहतूक सुरु होती.  

8/9

msrtcstrike

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी 14 ते 15 कोटींचा फटका महामंडळाला बसला.  

9/9

msrtcstrike

राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रामाणे वेतन देण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.