पहिल्याच सेशनमध्ये मोहम्मद सिराजने इतिहास घडवला! अख्खी टीम 55 वर All Out!

केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर भारत विरुध्द दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामन्यामध्ये गोलंदाज मोहम्मद सिराजने एकुण सहा विकेट घेतले. भारताने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवलत 55 धावांवर सर्व फलंदाजांना ऑऊट केलं आहे.

Jan 03, 2024, 20:18 PM IST

केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर भारत विरुध्द दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामन्यामध्ये गोलंदाज मोहम्मद सिराजने एकुण सहा विकेट घेतले. भारताने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवलत 55 धावांवर सर्व फलंदाजांना ऑऊट केलं आहे.

 

1/8

केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर भारत विरुध्द दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

2/8

दक्षिण आफ्रिकेच्या दोन सामन्यांमधील पहिला सामना भारताने गमवला होता. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला 32 रनांने हारवलं होतं. दुसरा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघास दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात कडवी झुंज द्यावी लागणार होती. 

3/8

 दुसरा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघास दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात कडवी झुंज द्यावी लागणार होती. 

4/8

केपटाऊनमधील कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर अक्षर: घुडगे टेकवले. दक्षिण अफ्रिकेने घेतलेला हा निर्णय भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या कैशल्याने चुकीचा ठरवला आहे.  

5/8

गोलंदाज मोहम्मद सिराजने एका मागे एक असे एकुण सहा विकेट घेतले.मोहम्मद सिराजने सर्वप्रथम एडन मार्करम याची विकेट घेतली. त्यानंतर डीन एल्गारची, डोनी डी जोरजी,  ट्रिस्टन स्ट्ब्स, डेविड बेडिंगघम, काइली वेरेयन आणि मार्को यॅान्सेन यांची विकेट घेतली.   

6/8

आजचा सामना भारताने जिकंल्यास 1-1 अशी मालिकेत बरोबरी होईल. 

7/8

भारतीय संघाला केपटाऊनच्या मैदानात खुप कमी वेळा यश प्राप्त झालं आहे. 1993 पासून या मैदानावर भारताने सहा पैकी चार पराभाव झाला आहे. उरलेले दोन सामन्यात अनिर्णित यश आलं होतं. भारतीय संघाने अखेरचा सामना 2022 मध्ये खेळला होता. तेव्हा भारतीय संघाला पराभूत व्हाव लागलं होतं. अशावेळी आजचा सामना जिंकणं भारतासाठी महत्वाचे असेल.

8/8

दुसरा कसोटी सामना जिंकायचा असा निर्धार भारतीय संघाने केला आहे. भारतीय खेळाडूंच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील खेळीवरून ते जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे