राज ठाकरेंनी मराठीतल्या 'या' प्रसिद्ध गाण्याला दिली होती चाल, तूफान चालला सिनेमा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमेरिकेत सॅन होजेला येथे बृहन्मराठी मंडळाच्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी त्याच्या विविध पैलूंचा उलगडा करण्यात आला. 

| Jun 29, 2024, 17:07 PM IST

MNS Chief Raj Thackeray:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमेरिकेत सॅन होजेला येथे बृहन्मराठी मंडळाच्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी त्याच्या विविध पैलूंचा उलगडा करण्यात आला. 

1/9

राज ठाकरेंनी मराठीतल्या 'या' प्रसिद्ध गाण्याला दिली होती चाल, तूफान चालला सिनेमा

MNS Chief Raj Thackeray give Music to Cham cham karta hai Marathi Movie Song

MNS Chief Raj Thackeray:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमेरिकेत सॅन होजेला येथे बृहन्मराठी मंडळाच्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी त्याच्या विविध पैलूंचा उलगडा करण्यात आला. 

2/9

'संगीतकार राज ठाकरे'

राजकारण समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला याकडे राज ठाकरेंचा पाहण्याचा दृष्टीकोन समोर आला. यावेळी आनंद इंगळे यांनी 'संगीतकार राज ठाकरे' जगासमोर आणले. त्याची एक आठवण त्यांनी सांगितली. 

3/9

वर्ल्ड डिस्नी स्टुडीओमध्ये अॅनिमेटर

मला कधीच राजकारणात यायच नव्हतं. वर्ल्ड डिस्नी स्टुडीओमध्ये अॅनिमेटर व्हायचं, अस कॉलेजला असताना त्यांनी स्वप्न पाहिल होतं. पण त्यावेळी कोणाला अर्ज करायचा, कुठे पाठवायचा? याबद्दल काहीच माहिती नव्हती, अशी आठवण त्यांनी सांगितली.  

4/9

व्यंगचित्राचा राजकारणात उपयोग

राजकीय व्यंगचित्रकार आणि राजकारण हे वेगळं नसतं. त्याचा उपयोग मला राजकारणात होतो, असे ते म्हणाले. 

5/9

चाल राज ठाकरेंनी पहिल्यांदा गुणगणुली

हातामध्ये रंग रेषा आहेत. संगीताचा कान आहे. राज ठाकरे स्वत: उत्तम संगीत देऊ शकतात. मित्राच्या चित्रपटातील एक चाल राज ठाकरेंनी पहिल्यांदा गुणगणुली होती. यानंतर पुढचं गाण लिहिलं गेलं, अशी आठवण आनंद इंगळे यांनी सांगितली. 

6/9

'छम छम करता है'

'छम छम करता है' या प्रसिद्ध गाण्याची मूळ चाल राज ठाकरेंची आहे, असे यावेळी आनंद इंगळे यांनी सांगितले. 

7/9

या आठवणीला राज ठाकरे यांनी दुजोरा दिला. संगीत मी दिलं असलं तरी त्या गाण्याचे शब्द माझे नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले. 

8/9

सिनेमाची क्रेझ आजही

2004 साली आलेल्या 'अगं बाई अरेच्चा!' या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले होते. हा सिनेमा त्यावेळी चांगलाच गाजला होता. वेगळं कथानक असलेल्या या सिनेमाची क्रेझ आजही  'छम छम करता है' हे प्रचंड गाजलेलं गाणं याच चित्रपटातील आहे. 

9/9

सर्व श्रेय ते राज ठाकरे यांना

'छम छम करता है' या गाणं बॉलिवूड अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रे दिसते. सिनेमा आला तेव्हा दिग्दर्शक केदार शिंदे यांचे वय अवघे 28 वर्ष होते. 2004 इतका मोठा सिनेमा बनवल्याचे सर्व श्रेय ते राज ठाकरे यांना देतात.