आमदार-खासदारांची मुलं शासकीय शाळेत का शिकत नाहीत? अजित पवारांनी दिले उत्तर

Ajit Pawar On Government School: राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तित कराव्या लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. 30 हजार शिक्षकांची भरती करत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांची देखील भरती केली जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

| Sep 09, 2023, 13:57 PM IST

Ajit Pawar On Government School: विद्यार्थ्यांनी इंग्रजी शिकण्यावर भर द्या असा सल्ला अजित पवार यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना दिला आहे. यासोबत अजित पवार यांनी लेखाजोखा मांडत आणि निकालावरुन शिक्षकांचे कान टोचले आहेत.

1/10

आमदार-खासदारांची मुलं शासकीय शाळेत का शिकत नाहीत? अजित पवारांनी दिले उत्तर

MLA MP children not studying in government school Ajit Pawar Give Answer

Pune Ajit Pawar: सरकारी शाळा टिकाव्यात यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. पण असे असताना आमदार,खासदारांची मुले मात्र शासकीय शाळांऐवजी खासगी शाळांमध्ये शिकताना दिसतात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्ते आणि परखड मतांसाठी ओळखले जातात. प्रश्न कोणताही असो, त्या आपली भूमिका परखडपणे मांडतात. 

2/10

इंग्रजी शिकण्यावर भर द्या

MLA MP children not studying in government school Ajit Pawar Give Answer

विद्यार्थ्यांनी इंग्रजी शिकण्यावर भर द्या असा सल्ला अजित पवार यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना दिला आहे. यासोबत अजित पवार यांनी लेखाजोखा मांडत आणि निकालावरुन शिक्षकांचे कान टोचले आहेत.

3/10

शिक्षक पुरस्कार वितरण

MLA MP children not studying in government school Ajit Pawar Give Answer

पुणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. 

4/10

मराठी शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तित

MLA MP children not studying in government school Ajit Pawar Give Answer

राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तित कराव्या लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. 30 हजार शिक्षकांची भरती करत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांची देखील भरती केली जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले. 

5/10

इंग्रजी माध्यमाकडील ओढा आणि गरज

MLA MP children not studying in government school Ajit Pawar Give Answer

यातून वेगळा अर्थ काढायचे कारण नाही. इंग्रजी माध्यमाकडील ओढा आणि गरज लक्षात घेता हा निर्णय घेणार आहोत. मराठी माध्यमाच्या शाळांना कमी लेखणे किंवा त्यांचं महत्व कमी करणे हा उद्देश नाही, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 

6/10

खास शैलीत उत्तर

MLA MP children not studying in government school Ajit Pawar Give Answer

यावेळी आमदार, खासदारांची मूले शासकीय शाळेत का शिकत नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. 

7/10

प्रत्येक पालकाचा अधिकार

MLA MP children not studying in government school Ajit Pawar Give Answer

आपल्या मुलांना कुठे शिकवायचं हा प्रत्येक पालकाचा अधिकार आहे. त्यामुळे त्यात जाण्यात काही अर्थ नाही.आज गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी घडत आहेत, असे ते म्हणाले. 

8/10

पहिलीपासून इंग्रजी

MLA MP children not studying in government school Ajit Pawar Give Answer

अगोदर पाचवीपासून असलेलं इंग्रजी आता पहिलीपासून सुरू झालं आहे. कालानुरूप यात बदल केला जातो. बदल करण्याची प्रक्रिया सुरू असते, असे त्यांनी सांगितले. 

9/10

हवं आहे ते मिळेल

MLA MP children not studying in government school Ajit Pawar Give Answer

शिष्यवृत्तीमध्ये अनेक शाळाचा चांगला निकाल लागला आहे, तर काही शून्य लागला आहे. सगळं दिलं जाईल. त्यामुळे ज्यांना हवं आहे ते मिळेल पण शिक्षण सुधारलं पाहिजे, असे आवाहन त्यांन शिक्षकांना केले. 

10/10

नवीन वाटा चोखाळा

MLA MP children not studying in government school Ajit Pawar Give Answer

मी मनात काही ठेवून बोलत नाही. नवीन पिढीला ज्ञान दिलं पाहिजे म्हणून सांगत होतो. मळलेल्या वाटेवर जाण्याऐवजी नवीन वाटा चोखाळा असं ते विद्यार्थ्यांना म्हणाले.