रात्री झोपेत असताना अचनाक भूक लागते? मग करा 'या' हेल्दी पदार्थांचे सेवन

Midnight Cravings Weight Loss Tips: रात्री झोपायच्या आधी तुम्ही मस्त पोट भरून जेवणं केल्यावर आता शांत झोपू असं प्रत्येकाला वाटतं. पण बऱ्याचवेळा अनेकांना रात्री अचानक झोपेत असताना भूक लागते. आता तुम्हाला वाटत असेल की ही एक गंभीर समस्या आहे. पण असं काही नाही रात्री झोपेत असताना भूक लागणं ही सामान्य गोष्ट आहे. बऱ्याचवेळा असं होतं की वजन कमी करण्याच्या प्रयत्न करत असलेले लोक रात्री जेवतच नाहीत मग रात्री झोपेत असताना भूक लागते आणि अशा वेळी आपण जे मिळेल ते खातो आणि यामुळे वजन वाढते. मग अशा वेळी काय खायला हवं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

| May 11, 2023, 18:35 PM IST
1/7

रात्री झोपेत असताना लागते भूक

Midnight Cravings Weight Loss Tips

काही लोकांना रात्री झोपेत असताना भूक लागल्यावर बिस्किटे, चिप्स, नमकीन, चॉकलेटचे किंवा आइसक्रीम हे पदार्थ खायला आवडतात. पण हे पदार्थ खाल्यानं तुम्हाला आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या होण्याची शक्यता असते. (Photo Credit : Pexels)

2/7

रात्री काय खायला हवं

Midnight Cravings Weight Loss Tips

रात्री भूक लागल्यावर काय खायला हवं? किंवा उपाशीच रहायला पाहिजे का? असा सवाल आता अनेकांना पडला असेल. चला तर जाणून घेऊया रात्री काय खायला हवं. (Photo Credit : Pexels)

3/7

पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी सांगितले काही हेल्दी ऑप्शन

Midnight Cravings Weight Loss Tips

पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी रात्री काय खायला हवं हे सांगितलं आहे. (Photo Credit : Pexels)  

4/7

रात्री काही खाण्याची इच्छा का होते किंवा भूक का लागते?

Midnight Cravings Weight Loss Tips

रात्री अचानक तुम्हाला नेहमी भूक लागते याचं नक्की कारण काय हे तुम्हाला माहितीये का? lj रक्तातील साखरेची असंतुलित पातळी, अनियमित जेवणपद्धती आणि नाईट इटिंग यांचा समावेश होतो. याशिवाय तुम्ही रात्री पुरसं जेवत नसनं हे देखील कारण असू शकते. (Photo Credit : Pexels)

5/7

रात्री खाण्याचे काही ऑप्शन

Midnight Cravings Weight Loss Tips

रात्री भूक लागल्यास तुम्ही काही वाफवलेल्या भाज्या आणि त्याच्यासोबत हुमस टोस्ट खाऊ शकता. (हुमस टोस्ट म्हणजे चणे आणि तीळ, ऑलिव्ह ऑइल, लिंबू आणि लसूण यांची पेस्ट किंवा चटणी) (Photo Credit : Nutrition by Lovneet Instagram) 

6/7

काजू किंवा सुका मेवा

Midnight Cravings Weight Loss Tips

रात्री अचानक भूक लागली तर तुम्ही काजू किंवा सुका मेवा खाऊ शकतात. (Photo Credit : Nutrition by Lovneet Instagram)   

7/7

मखाना, दूध, राजगिरीचे लाडू

Midnight Cravings Weight Loss Tips

मखाना हा देखील एक उत्तम उपाय आहे. याशिवाय तुम्ही 100 मिली दूध किंवा मग राजगिराचे लाडू देखील खाऊ शकतात. (Photo Credit : Nutrition by Lovneet Instagram)