मुंबई ते बंगळूरु... सिंगल चार्जमध्ये 949 KM चा नॉनस्टॉप प्रवास करणारी जगातील पहिली इलेक्ट्रिक कार; भारताचा अनोखा विश्वविक्रम

Mercedes Benz EQS 580 या कारचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया.  

| Sep 11, 2024, 17:25 PM IST

Mercedes Benz EQS 580 : भारतात बनलेल्या मर्सिडीज-बेंझ कारने (Mercedes benz eqs 580) अनोखा विश्वविक्रम रचला आहे. या कारने 
मुंबई ते बंगळूरु असा प्रवास केला. सिंगल चार्जमध्ये 949 KM चा नॉनस्टॉप प्रवास करणारी जगातील ही पहिली इलेक्ट्रिक कार ठरली आहे. Mercedes benz eqs 580 च्या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 

1/9

ऑटोकार इंडिया आणि मर्सिडीज-बेंझ इंडिया बनवलेल्या भारतीय Mercedes benz eqs 580 या कारची संपूर्ण जगभरात सध्या जोरदार चर्चा आहे. 

2/9

ही लक्झरी इलेक्ट्रिक लिमोझिन सेगमेंटमधील कार आहे. या कराची एक्स-शोरूम किंमत 1.62 कोटी रुपये आहे. 

3/9

ही कार 4.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास इतका स्पीड पकडते. या कारचा  टॉप स्पीड 210 किमी प्रतितास इतका आहे.

4/9

मर्सिडीज EQS 580  या कारमध्ये 4MATIC मध्ये 107.8 kWh ची लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. यासोबत 110 kW DC फास्ट चार्जर मिळतो. 

5/9

 मर्सिडीज EQS 580  हे सध्या मार्केटमधील सर्वात उच्च श्रेणीची इलेक्ट्रीक कार आहे.  गिनीज वर्ल्ड रिकॉर्डसाठी मर्सिडीजकंपनीने या कराची निवड केली. 

6/9

राहुल काकर यांनी ही कार ड्राईव्ह केली. मुंबई ते बंगळूरु प्रवासादरम्यान महामार्गावर कारचा ताशी वेग 50 ते 60 किलोमीटर इतका होता.

7/9

मर्सिडीज EQS 580 या कारने भर पावसात आणि खराब हवामानात मुंबई ते बंगळूरु प्रवास केला. प्रवासात अनेक अडथळे. शेवटच्या टप्प्यात कारचा टायर देखील पंक्चर झाला. मात्र, कारचा प्रवास थांबला नाही.

8/9

यापूर्वी युनायटेड किंगडममधील फोर्ड मस्टंग माच-ई या कारचा 916.74 किलोमीटरचा विक्रम  Mercedes benz eqs 580 ने मोडला आहे.  949 किलोमीटरचा नवा विक्रम रचला आहे. 

9/9

मर्सिडीज EQS 580 या कारने सिंगल चार्जवर 949 किलोमीटर पार केले आहे. मुंबई ते बंगळूरु असा प्रवास या कारने केला. या प्रवासाने विश्वविक्रम रचला आहे.