मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोडचं किती काम राहिलंय? कधी होणार सुरु? जाणून घ्या

Marine Drive to Worli Coastal Road: कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वरळी पर्यंत असून त्याची लांबी 10.58 किमी आहे.

| Dec 10, 2023, 08:47 AM IST

Marine Drive to Worli Coastal Road:  22 किमी लांबीच्या MTHL मार्गावरील वाहतूक देखील जानेवारीतच सुरू होणार आहे.

1/8

मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोडचं किती काम राहिलंय? कधी होणार सुरु? जाणून घ्या

Marine Drive to Worli Coastal road start January 2023 Announce CM Eknath Shinde

Marine Drive to Worli Coastal Road: मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पर्यायाने गाड्यादेखील वाढत आहेत. परिणामी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक दिसते. पण कोस्टल रोड यासाठी मोठा पर्याय म्हणून समोर येत आहे. यामुळे मुंबईच्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. 

2/8

2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला

Marine Drive to Worli Coastal road start January 2023 Announce CM Eknath Shinde

कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारी 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईतील वाहतूककोंडीची समस्या बऱ्याच अंशी सुटणार आहे. 

3/8

13 हजार कोटी रुपये खर्च

Marine Drive to Worli Coastal road start January 2023 Announce CM Eknath Shinde

हा कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वरळी पर्यंत असून त्याची लांबी 10.58 किमी आहे. त्याच्या बांधकामावर बीएमसी 13 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. 

4/8

जानेवारीतच सुरू

Marine Drive to Worli Coastal road start January 2023 Announce CM Eknath Shinde

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नुकताच CSR उत्कृष्टता पुरस्कार, 2023 कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 22 किमी लांबीच्या MTHL मार्गावरील वाहतूक देखील जानेवारीतच सुरू होईल, असे सांगितले. 

5/8

200 कोटी रुपये खर्च

Marine Drive to Worli Coastal road start January 2023 Announce CM Eknath Shinde

दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो-4 कॉरिडॉरमधील 7 स्थानके सुजज्ज सुमारे 200 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. 

6/8

7 स्थानकांचे फिनिशिंग

Marine Drive to Worli Coastal road start January 2023 Announce CM Eknath Shinde

पॅकेज C-09 अंतर्गत तयार होत असलेल्या 7 स्थानकांच्या फिनिशिंग कामावर ही रक्कम खर्च करण्यात येणार आहे. मेट्रो-4 मार्गावरील गरोडिया नगर मेट्रो स्टेशन ते सूर्या नगर मेट्रो स्टेशनपर्यंत प्लंबिंग, स्ट्रक्चरल वर्क, फॅब्रिकेशन आणि आर्किटेक्चरल कामांवर सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले जातील, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. 

7/8

बांधकाम 58 टक्के पूर्ण

Marine Drive to Worli Coastal road start January 2023 Announce CM Eknath Shinde

मुंबई ते ठाणे मेट्रोच्या माध्यमातून जोडण्यासाठी मेट्रो 4 बांधण्यात येत आहे. वडाळा-कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो-4 आणि मेट्रो-4A बांधण्यात येत आहेत. मेट्रो-4 चे बांधकाम 58 टक्के पूर्ण झाले असून मेट्रो-4A चे काम 61 टक्के पूर्ण झाले आहे.

8/8

मेट्रो 4 कॉरिडॉरचे काम सुरू

Marine Drive to Worli Coastal road start January 2023 Announce CM Eknath Shinde

ठाणे ते मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो मार्गावरील सेवा दोन टप्प्यात सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुलुंड ते घोडबंदर दरम्यान मेट्रो धावणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) 2025 पर्यंत मेट्रो-4 कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यावर मेट्रो सेवा सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. या मेट्रो मार्गाच्या संपूर्ण मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 2026-27 पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.