नजर जाईल तिथपर्यंत मराठाच मराठा... नवी मुंबईतील संयमी आंदोलनाचे फोटो पाहून व्हाल थक्क

Maratha Aarakshan Rally Navi Mumbai Manoj Jarange Patil Supporters: मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेनं येण्याचा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सकाळी 9 च्या सुमारास दाखल झालं. मात्र या ठिकाणी असलेली मराठा आंदोलकांची गर्दी जराही सरलेली नाही.

| Jan 26, 2024, 14:53 PM IST
1/9

maratha aarakshan rally route navi mumbai manoj jarange patil photos of supporters

मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरत आपल्या मागण्यांवर ठाम असणारे मनोज जरांगे पाटील आज नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर फार मोठ्या संख्येनं मराठा समाजातील लोक या मोर्चात सहभागी झालेत. 

2/9

maratha aarakshan rally route navi mumbai manoj jarange patil photos of supporters

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि लाखो मराठा समर्थकांचं वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलं आहे. हे भगवं वादळ मुंबईत धडकल्यास राजधानी मुंबई ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळंच मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवून, आझाद मैदान तसंच शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यास परवानगी नाकारली असल्याने जरांगे आज समर्थकांसहीत नवीन मुंबईतच तळ ठोकून आहेत.

3/9

maratha aarakshan rally route navi mumbai manoj jarange patil photos of supporters

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सकल मराठा समाज आंदोलक आपल्या वाहनांसह मुंबईत आल्यास त्याचा विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अशी भीती मुंबई पोलिसांनी नोटिशीत व्यक्त केली आहे. खारघरमधील इंटनॅशनल कॉर्पोरेशन पार्क आंदोलनासाठी योग्य ठरेल, असंही या नोटिशीत पोलिसांनी सुचवलं आहे.

4/9

maratha aarakshan rally route navi mumbai manoj jarange patil photos of supporters

मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेनं येण्याचा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सकाळी 9 च्या सुमारास दाखल झालं. सामाजिक न्याय मंत्री सचिव सुमंत भांगे, मंगेश चिवटे यांचा शिष्टमंडळात समावेश. ही बैठक सुरु असतानाही हजारो समर्थक बाहेर रस्त्यावर बसून असल्याचं दिसून आले.

5/9

maratha aarakshan rally route navi mumbai manoj jarange patil photos of supporters

वाशी बस स्थानक परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार असल्यामुळे वाशी बस स्थानक मध्ये येणाऱ्या सर्व गाड्या सायन पनवेल मार्गे अप-डाऊन फिरवण्यात आलेले आहेत. कोपरखैरणे कडून वाशी कडे येणाऱ्या गाड्या पाम बीच मार्गे फिरवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी मराठा समाजातील बांधवांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

6/9

maratha aarakshan rally route navi mumbai manoj jarange patil photos of supporters

बाहेर मराठा समाजातील तरुण बसून असतानाच मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुपारी 12 च्या सुमारास बोलणं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

7/9

maratha aarakshan rally route navi mumbai manoj jarange patil photos of supporters

मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे-पाटील या दोघांमध्ये दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, यादरम्यान आंदोलन मागे घेण्यात यावं असं राज्य सरकारकडून जरांगेंना सांगण्यात आलं आहे. जरांगेच्या सभेसाठी तरुणांनी मोठी गर्दी केली आहे.

8/9

maratha aarakshan rally route navi mumbai manoj jarange patil photos of supporters

शिष्टमंडळ आणि जरांगेदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये शासनाचे अनेक निर्णय जरांगे पाटील यांना दाखवण्यात आले आहेत. चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे नवी मुंबईमध्येच आंदोलन मागे घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जरांगे पाटील दुपारी 1 च्या सुमारास सभा घेणार आहेत.

9/9

maratha aarakshan rally route navi mumbai manoj jarange patil photos of supporters

लहान मुलेही बॅनर्स आणि पोस्टर्स घेऊन या आंदोलनामध्ये आपल्या पालकांबरोबर सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.