Bollywood Wedding : बॉलिवूडला लगीनघाई! आता 'हे' स्टार कलाकार अडकणार लग्नबंधनात

आता 'या' 5 बॉलिवूड कपल्सना लागलीय लगीनघाई, कोण आहेत हे स्टार कपल? 

Nov 23, 2022, 22:46 PM IST

मुंबई : देशभरात लग्न सोहळ्याला (Bollywood Wedding) सुरूवात झाली आहे. आता अशाच लग्न सोहळ्याचा धडाका बॉलिवूडमध्येही सुरु होणार आहे. कारण बॉलिवूडमधील अनेक कपल (Bollywood Couple) लग्नबंधनात अडकण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान हे लग्नबंधनात अडकणारे हे स्टार्स कोण आहेत, हे जाणून घेऊयात. 

1/5

 Malaika Arora Arjun Kapoor

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी अनेकदा सांगितले आहे की, त्यांना त्यांच्या नात्याला आणखी एक पाऊल पुढे टाकायचे आहे. यावेळी दोघेही लग्न करू शकतात असेही बोलले जात आहे.

2/5

Kiara Advani Sidharth Malhotra

कियारा (Kiara Advani) आणि सिद्धार्थच्या (Sidharth Malhotra) प्रेमाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या आणि आता दोघांनीही सर्वांसमोर हे नातं स्वीकारलं आहे. दोघंही यावर्षी लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत, त्यासाठी लग्नाची तयारी गुपचूप सुरू आहे.

3/5

Rakul Preet Singh Jackky Bhagnani

रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) यांनीही त्यांचे नाते अधिकृत केले आहे. परंतु आतापर्यंत दोघांनीही लग्न केले नाही. या लग्नाच्या सीझनमध्ये ते लग्न देखील करू शकतात अशी शक्यता आहे.

4/5

Nandita Mahtani Vidyut Jammwal

नंदिता महतानी (Nandita Mahtani) आणि विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) यांनी गेल्यावर्षी त्यांच्या एंगेजमेंटची बातमी देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आणि आता हे दोघे लग्नाच्या सीझनमध्ये लग्न करू शकतात अशी बातमी आहे. 

5/5

Ira Khan Nupur Shikhare

आमिर खानची लाडकी आयरा खाननेही (Ira Khan) नुपूर शिखरेसोबतचे (Nupur Shikhare) नाते आणखी एक पाऊल पुढे नेले आहे.लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाच्या मोसमात दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.