Malaika-Arjun: अर्जुन मलायकाचं खरंच ब्रेकअप झालं? अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली, 'तुमचं वागणं पाहा...'

Malaika Arora Cryptic Post : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये अस्वस्था आहे.

Sep 06, 2023, 10:29 AM IST

Malaika Arora Cryptic Post : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झालं अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर हे दोघे लंच डेटला एकत्र दिसले. त्याच संध्याकाळी एका सोहळ्यातही हे दोघे एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे ब्रेकअपच्या अफवा असल्याचं बोलं जातं होतं. 

1/8

अभिनेत्री मलायकाच्या नव्या इन्स्टाग्रामवर पोस्टमुळे पुन्हा एकदा या दोघांमध्ये काही आलबेल नाही असंच वाटतंय. 

2/8

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरची जोडी चाहत्यांना खूप आवडते. ते दोघे अनेक वेळा ट्रोलही झाले आहेत. 

3/8

मलायका अरोराने सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. ज्या तिने लिहिलं आहे की, स्त्री तुम्ही तिच्याशी कसं वागता याचं प्रतिबिंब बनते. जर तुम्हाला तिचं वागणं आवडत नसेल तर तुम्ही तिच्याशी कसं वागता ते पाहा.

4/8

 याशिवाय मलायकाने अजून एख गुड मॉर्निंगची आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिलं आहे की, भविष्याची काळजी घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वर्तमान क्षणाची काळजी घेणे. 

5/8

दुसरीकडे जेव्हा ब्रेकअपच्या अफवा उडाल्या होत्या तेव्हा अर्जुनने त्याच्या सोलो ट्रिपचे फोटो शेअर केले होते. त्यावर मलायकाने लाइक किंवा कमेंटही केलं नव्हतं.   

6/8

पण त्यानंतर मलायका आणि अर्जुन 27 ऑगस्ट 2023 ला लंचला एकत्र दिसले होते. त्याच संध्याकाळी ते पुन्हा एकदा कपल म्हणून एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

7/8

ब्रेकअपची बातमी समोर आली त्यावेळीच अर्जुनचं नाव कुशा कपिलासोबत जोडलं गेलं होतं. कुशाचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला आहे. 

8/8

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरो यांच्या वयात सुमारे 10 वर्षांचा फरक आहे. अर्जुन आणि मलायका यांनी 2019 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केलं होतं.