Makar Sankrant 2023 : मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल!

Makar Sankranti Lucky Zodiac Signs: सूर्य देव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा भारतात सर्वत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. हा सण दरवर्षी 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी रोजी येत असते. यंदाच्या वेळी हिंदू कॅलेंडरनुसार 14 जानेवारी रोजी रात्री 8.14 वाजता सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. भगवान सूर्याच्या कृपेने या दिवशी काही राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल. चला जाणून घेऊया...

Jan 11, 2023, 16:54 PM IST
1/5

मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या दिवशी तुम्ही जे काही काम कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल. प्रगतीची नवीन दारे उघडतील. 

2/5

मेष राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांत चांगली बातमी मिळू शकते. या दिवशी या राशीतील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळू शकते. तसेच कुटुंबात काही शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते.

3/5

मकर संक्रांतीच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना सूर्यदेवाची कृपा असेल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच अशा लोकांना नोकरीच्या ठिकाणी उत्कृष्ट संधी मिळतील. आयात-निर्यातीशी निगडित लोकांना मोठा फायदा होईल. 

4/5

मकर संक्रांतीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. या काळात तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. जे सरकारी नोकरीत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. 

5/5

सूर्याच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना शुभलाभ मिळतील. व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. मान-सन्मानात वाढ होईल. जे युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना लवकरच यश मिळेल.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)