...म्हणून 'राफेल' ठरणार शत्रूचा कर्दनकाळ

Jul 29, 2020, 15:13 PM IST
1/6

भारतीय सैन्यदलाची ताकद वाढवत बहुप्रतिक्षित राफेल अखेर भारतीय भूमीत दाखल झाली आहेत. मुख्य म्हणजे चीन, पाकिस्तान यांसारख्या राष्ट्रांच्या सीमाभागात सुरु असणाऱ्या हालचाली पाहता या राष्ट्रांसाठी राफेल चिंता वाढवणार आहे. एका अर्थी शत्रूचा कर्दनकाळच ठरणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. 

2/6

जमीन, पाणी आणि हवेतून शत्रूवर मारा करण्याची भारतीय लष्कराची ताकद राफेलमुळं आणखी वाढली आहे. भारतीय लष्कराची शस्त्रं शत्रूवर अणुहल्ला करण्यासाठी आधीपासून सज्ज होती. पण, आता वायुदलाच्या बाहुबली राफेलच्या येण्यानं ही ताकद आणखी वाढणार आहे. 

3/6

अणुक्षेपणास्त्र वाहून नेण्याचं वैशिष्ट्य राफेलचं वेगळेपणं आहे. चीन आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये हे वैशिष्टय नाही. 

4/6

ट्विन इंजिन, डेल्टा विंग या वैशिष्ट्यांसह राफेल फोर्थ जनरेशनचं लढाऊ विमान आहे. ज्याच्या सहाय्यानं सहज अणुहल्ला करता येऊ शकतो. ओम्निरोल एअरक्राफ्ट म्हणूनही राफेलची ओळख. एअर डिफेन्सपासून भूतलावरील माऱ्यापर्यंत सर्व प्रकारच्या कामांत अग्रेसर आहे. 

5/6

एका राफेलमध्ये शत्रूच्या पाच विमानांचा नायनाट करण्याची क्षमता आहे. एअर टू एअर मिसाईल रेंज हे याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. ही रेंज १५० किमी. पेक्षा जास्त आहे. म्हणजे भारतीय सीमेतूनच पाकिस्तानात दूरवर प्रहार करता येऊ शकतो

6/6

लहान आकार आणि अचूक वेध साधण्याच्या क्षमतेमुळं राफेलला युद्धक्षेत्रात 'किलर' म्हटलं जातं.