Heat Stroke : उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा कराल? राज्याच्या आरोग्य विभागाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Heat Stroke : राज्यात सध्या काही भागांमध्ये अवकाळीचं सत्र सुरु असलं तरीही बऱ्याच भागांमध्ये तापमानाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी उष्माघाताचाही धोका वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
Maharashtra Weather : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान 12 श्री सेवकांचा मृत्यू ओढावला. कारण ठरलं ते म्हणजे उष्माघात. एप्रिल महिन्यातील रणरणत्या उन्हाचा दाह अनेकांनाच सोसवत नाही, त्यात खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये झालेली गर्दी आणि वरून होणारा सूर्यकिरणांचा मारा पाहता अनेकांनाच या भीषण उकाड्याचा त्रास झाला. काहींना प्राणाला मुकावं लागलं. थोडक्यात उष्माघात परिस्थिती किती गंभीर करू शकतो याचं दाहक वास्तव यावेळी समोर आलं.