राज्यात पावसाचं धुमशान! कुठे दरडी कोसळल्या तर कुठे नदीचे रौद्ररूप; पाहा धडकी भरवणारे PHOTO

Maharashtra Rain Photos: राज्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळं मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागांत पूरस्थितीदेखील निर्माण झाली आहे.

Mansi kshirsagar | Jul 25, 2024, 15:22 PM IST
1/11

राज्यात पावसाचं धुमशान! कुठे दरडी कोसळल्या तर कुठे नदीचे रौद्ररूप; पाहा धडकी भरवणारे PHOTO

Maharashtra Rain Alert Heavy Rain in Pune Mumbai Thane Raigad Palghar Waterlogging Landslide Latest Photos

पुणे, कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहेत. काही जिल्ह्यातील नद्यांनी धोका पातळी गाठली आहे. त्यामुळं पुराचं पाणी  शहरात व गावागावात शिरलं आहे. 

2/11

उल्हास नदी

Maharashtra Rain Alert Heavy Rain in Pune Mumbai Thane Raigad Palghar Waterlogging Landslide Latest Photos

कालपासून कोसळत असलेल्या पावसामुळे कल्याण ग्रामीण भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण नगर महामार्गावरील रायते पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

3/11

भिमाशंकर

Maharashtra Rain Alert Heavy Rain in Pune Mumbai Thane Raigad Palghar Waterlogging Landslide Latest Photos

भिमाशंकर मार्गावर दरड कोसळली असुन राजगुरुनगर मार्गे भिमाशंकरला जाणारी वाहतुक बंद करण्यात आली अनेक गावांना दरड कोसळण्याचा धोका  

4/11

रेती बंदर

Maharashtra Rain Alert Heavy Rain in Pune Mumbai Thane Raigad Palghar Waterlogging Landslide Latest Photos

कल्याणच्या रेती बंदर परिसरात खाडीचे पाणी शिरले आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. खाडीलगत असलेल्या घरातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.

5/11

राजगुरुनगर

Maharashtra Rain Alert Heavy Rain in Pune Mumbai Thane Raigad Palghar Waterlogging Landslide Latest Photos

पुण्याच्या राजगुरुनगर येथील पोलीस कस्टडीत गुडघाभर पाणी साचले आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसाने येथील चारही कस्टडी रुममध्ये गुडघाभर पाणी शिरले आहे.

6/11

आंबेगाव

Maharashtra Rain Alert Heavy Rain in Pune Mumbai Thane Raigad Palghar Waterlogging Landslide Latest Photos

पुण्यातील आंबेगाव येथील जांभळेवाडीवरील बाजूस असणाऱ्या डोंगराचा काही भाग कोसळला आहे. रस्त्यावर दरड कोसळल्याने तीन वाड्यांचा संपर्क तुटला.

7/11

बदलापूर कर्जत महामार्ग

Maharashtra Rain Alert Heavy Rain in Pune Mumbai Thane Raigad Palghar Waterlogging Landslide Latest Photos

बदलापूर कर्जत महामार्ग पाण्याखाली रेल्वे रूळ पाण्याखाली येण्याची शक्यता. संततधार पावसानं बदलापूर कर्जत महामार्ग चामटोली जवळ पाण्याखाली आला आहे

8/11

एकता नगर

Maharashtra Rain Alert Heavy Rain in Pune Mumbai Thane Raigad Palghar Waterlogging Landslide Latest Photos

सिंहगड रोडवरील एकता नगर परिसरात पुराचे पाणी साचले आहेत. त्यावेळी अडकलेल्या नागरिकांना बोटींच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले.

9/11

राधानगरी धरण

Maharashtra Rain Alert Heavy Rain in Pune Mumbai Thane Raigad Palghar Waterlogging Landslide Latest Photos

कोल्हापुरातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

10/11

ताम्हिणी घाट

Maharashtra Rain Alert Heavy Rain in Pune Mumbai Thane Raigad Palghar Waterlogging Landslide Latest Photos

रायगडमधील ताम्हिणी घाटात दरड कोसळली आहे.या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. माणगाव पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प

11/11

विहार तलाव

Maharashtra Rain Alert Heavy Rain in Pune Mumbai Thane Raigad Palghar Waterlogging Landslide Latest Photos

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार तलाव पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे.