मुली म्हणजे सर्वस्व; आयुष्यानं आघात करुनही समाजापुढे पायंडा घालणाऱ्या CJI Chandrachud यांच्या कुटुंबाचे Photos

Maharashtra political crisis : सर्वोच्च न्यायालयात 50 वे सरन्यायाधीश या पदाचा पदभार स्वीकारल्या क्षणापासूनच CJI Chandrachud यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतींनी आणि सिद्धांतांनी साऱ्या देशाचं लक्ष वेधलं. 

Mar 15, 2023, 13:44 PM IST

Maharashtra political crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु असतानाच सरन्यायाधीश DY Chandrachud यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठानं सत्ताधाऱ्यांना सवाल करण्यास सुरुवात केली. 

1/6

CJI Chandrachud family

Maharashtra political crisis Cji Chandrachud adopted two disabled daughters know more about his family

CJI Chandrachud यांचे वडील, वाय.वी. चंद्रचूड हेसुद्धा सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशपदी सेवेत होते. ते देशाचे 16 वे सरन्यायाधीश होते. 

2/6

CJI Chandrachud daughters

Maharashtra political crisis Cji Chandrachud adopted two disabled daughters know more about his family

CJI Chandrachud यांच्या नावे आतापर्यंत अनेक ऐतिहासिक निर्णयांची नोंद आहे. मॅरिटल रेपसंदर्भातील निर्णयही त्यांनीच सुनावला होता. तर, अयोध्या, सबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, समलैंगिकता म्हणजे गुन्हा नाही अशा ऐतिहासिक निर्णयांमध्येही त्यांचं मोलाचं योगदान होतं. 

3/6

CJI Chandrachud age

Maharashtra political crisis Cji Chandrachud adopted two disabled daughters know more about his family

संवेदनशील मुद्द्यांकडे व्यापकपणे पाहत त्याचा सर्वच बाजूंनी विचार करत निर्णय देण्यासाठी CJI Chandrachud ओळखले जातात. 

4/6

CJI chandrachud biography

Maharashtra political crisis Cji Chandrachud adopted two disabled daughters know more about his family

कुटुंबावर त्यांचा विशेष जीव. इतका की, कामाची सुरुवात करण्याआधी एकदा त्यांनी आपल्या मुलींना स्वत:चं कार्यालयही दाखवलं होतं. दिल्लीमध्ये कुटुंबासोबत ते वास्तव्यास आहेत. पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार.  

5/6

supreme court judges

Maharashtra political crisis Cji Chandrachud adopted two disabled daughters know more about his family

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पहिल्या पत्नी रश्मी यांचं 2007 मध्ये कर्करोगामुळं निधन झालं होतं. ज्यानंतर त्यांनी काही वर्षांनी दुसरं लग्न केलं. त्यांची दुसरी पत्नी, कल्पना दास यासुद्धा वकील आहेत. ब्रिटीश काऊन्सिलमध्येही त्या सेवेत होत्या.   

6/6

CJI Chandrachud wife

Maharashtra political crisis Cji Chandrachud adopted two disabled daughters know more about his family

पहिल्या पत्नीपासून चंद्रचूड यांना दोन मुलं असून, ते दोघंही नामवंत वकील आहेत. तर, दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी आणि पत्नीनं मुली दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. माही आणि प्रियंका अशी  दत्तक घेतलेल्या मुलींची नावं. या दोघींनाही शारीरिक व्यंगानं (Special Child) ग्रासलेलं आहे, त्यामुळेच अशा मुलींची जबाबदारी घेण्याच्या चंद्रचूड दाम्पत्याच्या निर्णयाचं सर्वच स्तरांतून स्वागत झालं.