MahashivRatri 2024: मुंबईतील प्राचीन शिवमंदिरांचा अनोखा इतिहास

शिव आणि शक्तीचा उत्सव म्हणून भारतात महाशिवरात्री साजरी करण्यात येते.उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत विस्तारलेले बारा ज्योतिर्लिंग हे हिंदू धर्मातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातात.या देशाला प्राचीन शिवमंदिराचा वारसा लाभला आहे.अशाच मुंबईतील काही प्राचीन शिवमंदिरांचा अनोखा इतिहास जाणून घेऊयात…

Mar 02, 2024, 20:31 PM IST

शिव आणि शक्तीचा उत्सव म्हणून भारतात महाशिवरात्री साजरी करण्यात येते.उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत विस्तारलेले बारा ज्योतिर्लिंग हे हिंदू धर्मातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातात.या देशाला प्राचीन शिवमंदिराचा वारसा लाभला आहे.अशाच मुंबईतील काही प्राचीन शिवमंदिरांचा अनोखा इतिहास जाणून घेऊयात…

1/6

बाबुलनाथ मंदिर

लोकल आणि ट्राफिकच्या गोंगाटापासून अलिप्त असलेलं वाळकेश्वरचं बाबुलनाथ मंदिर हे मायानगरी मुंबईतील सर्वात जुनं मंदिर आहे. 350 वर्ष जुनं हे शिवमंदिर मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.  

2/6

या मंदिराविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, हे शिवलिंग बाभूळाच्या झाडाच्या सावलीत एका गुराख्याला दिसले होते. त्यामुळे या मंदिराला बाबुलनाथ हे नाव देण्यात आहे.श्रावण सोमवार आणि इतर दिवशीही शिवभक्त या ठिकाणी ध्यान करण्यासाठी येत असतात.   

3/6

खिडकाळेश्वर

हेमाडपंथी शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणजे कल्याण जवळील खिडकाळेश्वर शिवमंदिर. शिवकाळाचा इतिहास सांगणाऱ्या ऐतिहासिक कल्याणमधील खिडकाळेश्वर मंदिराला शिवभक्त मोठ्या प्रमाणात भेट देतात.

4/6

 मंदिर परिरसरात अनेक पक्ष्यांचं दर्शन होतं, त्यामुळे याठिकाणाला पक्षीतज्ञ आवर्जून भेट देतात.     

5/6

जागनाथ महादेव मंदिर

घोडबंदर परिसरात संगमरवरी जागनाथ महादेवाचं मंदिर आहे. ठाणे भाईंदर महामार्गावरील या मंदिराचा परिसर निसर्गसौंदर्याने वेढलेला आहे. टेकडीवर असलेल्या मंदिराच्या समोर भव्य पटांगण आहे. पावसाळ्यात  तुडू्ंब वाहणारी खाडी, हिरवीगार झालेली टेकडी आणि पांढऱ्या रंगांचं संगमरवरी महादेवाचं मंदिर मनाला भूरळ घालतं.   

6/6

श्रीगंगा गोरजेश्वर

ठाण्यापासून जवळ  शहापूरमधलं श्रीगंगा गोरजेश्वर. मानसमंदिराप्रमाणेच हे महादेवाचं मंदिर विलोभनीय आहे.  हे मंदिर 500 वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जातं. काळू नदीच्या पात्रात वसलेलं हे मंदिर हिंदू धर्मातील प्रचीन स्थापत्यकलेची साक्ष देतं. हेमाडपंथी शिल्पकलेचा अनुभव घ्यायचा असल्यास या मंदिराला नक्की भेट द्या. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवपिंड ही पाण्यात असून मंदिर परिसरात गरम पाण्याची कुंड आहेत.