48 नाही 'हे' 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार 'निकाल'

Real vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये 'खरी शिवसेना' विरुद्ध 'नकली शिवसेना' त्याचप्रमाणे 'खरी राष्ट्रवादी' विरुद्ध 'नकली राष्ट्रवादी' असा वाद सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत अनेकांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. मात्र या दोन्ही पक्षांपैकी खरं कोण आणि खोटं कोण याचा निकाल महाराष्ट्रातील 48 नाही तर केवळ 15 मतदरासंघांमधून लागणार आहे. हे मतदारसंघ कोणते ते पाहूयात..

| May 16, 2024, 14:59 PM IST
1/17

Real vs Fake Shivsena NCP

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील 48 पैकी 13 मतदारसंघांत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना होणार आहे.

2/17

Real vs Fake Shivsena NCP

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये 2 मतदारसंघांमध्ये थेट लढत होणार आहे.

3/17

Real vs Fake Shivsena NCP

म्हणजेच राज्यातील एकूण 15 मतदारसंघांमधील जनाधार कोणाच्या बाजूने असेल यावर खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोण हे ठरेल असं म्हणता येईल. या 15 मतदारसंघांमध्ये शिवसेनेतील बंडखोरीनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत जनमताचा कौल कोणाच्या बाजूने जातो हे पहाणं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचं ठरणार आहे. हे 15 मतदारसंघ कोणते ते पाहूयात..

4/17

Real vs Fake Shivsena NCP

महाराष्ट्रातील सर्वात जुन्या पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेमध्ये 2 वर्षांपूर्वी उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदार पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी पक्षावर दावा केला. निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच शिवसेना हे नाव आणि पक्ष चिन्ह दिलं.

5/17

Real vs Fake Shivsena NCP

शिवसेनेबरोबर जे घडलं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील जनतेनं 2023 च्या मध्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या माध्यमातून पाहिली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मोठ्या गटाने स्वपक्षाविरुद्ध बंड करत सरकारमध्ये स्थापन होण्याचा निर्णय घेतला. 

6/17

Real vs Fake Shivsena NCP

निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी जो निर्णय शिवसेनेसंदर्भात दिलेला तसाच निर्णय राष्ट्रवादीसंदर्भात देत अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह दिलं.

7/17

Real vs Fake Shivsena NCP

या नाट्यमय घडामोडींनंतरची लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात पहिलीच मोठी निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे राज्यात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत.

8/17

Real vs Fake Shivsena NCP

एका शिवसेनेचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत सहभागी होऊन मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे करत आहेत. तर दुसऱ्याचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आहे.

9/17

Real vs Fake Shivsena NCP

राष्ट्रवादीचीही अशीच अवस्था असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एक आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दुसरी राष्ट्रवादी असे परस्पर दोन विरोधी गट यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

10/17

Real vs Fake Shivsena NCP

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट यांची महायुती विरुद्ध भाजपा, अजित पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट या महायुतीचा थेट सामना होत आहे.  

11/17

Real vs Fake Shivsena NCP

यापैकी ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट या दोन्ही शिवसेना पक्षांमध्ये कल्याण, ठाणे, वायव्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, शिर्डी, हातकणंगले, नाशिक, हिंगोली, औरंगाबाद, यवतमाळ-वाशिम आणि बुलढाणा या 13 मतदारसंघांमध्ये थेट लढत होत आहे.

12/17

Real vs Fake Shivsena NCP

तर दुसरीकडे महायुतीमधील जागावाटपात अजित पवार गटाच्या वाट्याला केवळ चार जागा आल्या असून त्यापैकी दोन जागांवर त्यांचा सामना शरद पवार गटाशी होणार आहे. रायगड आणि धाराशिवमध्ये अजित पवार गट ठाकरे गटाविरुद्ध लढणार आहे.  

13/17

Real vs Fake Shivsena NCP

पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि बारामती या दोन मतदारसंघांमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी राष्ट्रवादीमध्येच निवडणुकीच्या रिंगणात लढाई होत आहे.  

14/17

Real vs Fake Shivsena NCP

महाविकास आघाडीतील जागावाटपात 10 जागा लढवणारा शरद पवार गट हा बीड, म्हाडा, रावेर, दिंडोरी, सातारा, वर्धा, नगर, भिवंडी या आठ मतदारसंघांमध्ये भाजपाविरुद्ध लढणार आहे.

15/17

Real vs Fake Shivsena NCP

तसेच ठाकरे गट पालघर, सांगली, ईशान्य मुंबई, जळगाव, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपाविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात आहे.  

16/17

Real vs Fake Shivsena NCP

पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले भाजपा आणि काँग्रेस राज्यातील 48 पैकी 15 मतदारसंघांमध्ये थेट आमने-सामने आहेत.   

17/17

Real vs Fake Shivsena NCP

त्यामुळे आता ठाकरे विरुद्ध शिंदे आणि अजित पवार विरुद्ध शरद पवार गट या लढतींमधील 15 मतदारसंघांमध्ये जनतेला कौल कोणाच्या बाजूने पडतो आणि कोण खरी शिवसेना तसेच खरी राष्ट्रवादी ठरते हे 4 जूनलाच स्पष्ट होईल.